सीएएच्या समर्थनासाठी चंद्रपुरात तिरंगा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 14:13 IST2019-12-28T14:12:16+5:302019-12-28T14:13:06+5:30
सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ चंद्रपुरात शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास तिरंगा मोर्चा काढण्यात आला.

सीएएच्या समर्थनासाठी चंद्रपुरात तिरंगा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ चंद्रपुरात शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास तिरंगा मोर्चा काढण्यात आला. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली येथील गांधी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. यात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला व निवेदन देण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.