वृक्षारोपणाने मृतक कामगारांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:35+5:302021-06-29T04:19:35+5:30
घुग्घुस : संयुक्त खदान मजदूर संघ (आयटक) मुंगोली, कोलगावच्या वतीने वेकोलि वणी क्षेत्रातील मुंगोली उपक्षेत्रातील कोरोना काळात वेळेवर ...

वृक्षारोपणाने मृतक कामगारांना आदरांजली
घुग्घुस : संयुक्त खदान मजदूर संघ (आयटक) मुंगोली, कोलगावच्या वतीने वेकोलि वणी क्षेत्रातील मुंगोली उपक्षेत्रातील कोरोना काळात वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत झालेल्या १८ कामगारांना आर.सी. कार्यालय व कैलाशनगर कामगार वसाहतीत वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी उपक्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र प्रसाद सिंग, क्षेत्रीय संयुक्त खदान मजदूर संघाचे अध्यक्ष जियाउल्ला खान, सचिव मुरली चिंतलवार, शरद ठाकरे, रमेश क्षीरसागर, मेघश्याम गोहणे, अनिल प्रसाद, नरेश कैथल, मनोज चिकाते, क्षेत्रीय समन्वय समिती सदस्य तथा कार्यक्रमाचे आयोजक विजय अड्डुरवार, सुधाकर बोबडे, सुनील वाघमारे, विजय ताजने, बुचापती डुंडे,परिमल जानेकर, सुदर्शन तेलंग, सरोज हस्तक, मनोज वासेकर, नितीन दिकोंडवार, राजू नेवले, कृष्ण शंभरकर, दिनेश येरमे यांची उपस्थिती होती.