शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

मूल पंचायत समितीत वृक्ष लागवडीचा फज्जा

By admin | Updated: October 25, 2014 22:37 IST

पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या ४८ ग्रामपंचायतींच्या ११० गावात सन २०१४-१५ या चालू वर्षात १ लाख ९ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायतीला रोपे न मिळाल्याने

राजू गेडाम - मूलपंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या ४८ ग्रामपंचायतींच्या ११० गावात सन २०१४-१५ या चालू वर्षात १ लाख ९ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायतीला रोपे न मिळाल्याने फक्त ९ हजार ६३५ रोपांची लागवड करण्यात आली. त्यामुळे पंचायत समितीने या वर्षात ठरविलेल्या शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पंचायत समिती मूलच्या वतीने शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ या वर्षात ४८ ग्रामपंचायतीच्या गावात १ लाख ९ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात नलेश्वर व आकापूर हे गाव वगळता उर्वरित ४६ गावात फक्त ५० हजार २३० खड्डे खोदण्यात आले. एकूण उद्दिष्टाच्या ५० टक्के खड्डे खोदण्यात आले खरे; मात्र रोपाची लागवड करताना रोपे नसल्याने ग्रामपंचायतीची भंबेरी उडाली. पंचायत समिती मूलने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र तालुक्यात व परिसरातील गावात रोपे नसल्याने वृक्षलागवडीच्या कामाला ब्रेक लागला. खड्डे खोदलेल्या फक्त १३ गावात ओढून तोडून ९६३५ रोपे लावण्यात आली. उर्वरित खड्डे खोदले असतानादेखील त्या गावात एकही रोपे लावण्यात आली नाही. यात चिरोली, खालवसपेठ, टोलेवाही, चिखली, बोरचांदली, नलेश्वर, उथळपेठ, सुशी, दाबगाव मक्ता, केळझर, कोसंबी, काटवन, गांगलवाडी, मोरवाही, आकापूर, चितेगाव, गडीसूर्ला, उश्राळा, भादुर्णी, बोडाळा खु. नांदगाव, गोवर्धन, बोडाळ बु. नवेगाव बुजला, बाबराळा, भेजगाव, पिपरी दीक्षित, चिचाळा, चक दुगाळा, हळदी, डोंगरगाव, फिस्कुटी या ३२ गावांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या मते, तालुक्यात रोपे उपलब्ध असावेत असे वाटले. मात्र प्रत्यक्षात रोपे उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. ज्या ग्रामपंचायतीजवळ रोपाची उपलब्धता होती, त्यांनी काही प्रमाणात लागवड केली. मात्र काहींना खड्डे खोदले असतानाही रोपे लावता आले नाही. वृक्षलागवडीसाठी बाहेरील जिल्ह्यातून रोपाची आयात केली जाणार असल्याचे सांगितले. एकंदरीत वेट अ‍ॅन्ड वॉच ही भूमिका पंचायत समिती मूल घेणार असल्याने गावाना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. रोपांअभावी तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला ग्रहण लागले आहे. याला अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.