५३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST2021-08-23T04:30:13+5:302021-08-23T04:30:13+5:30

चंद्रपूर : मागील २४ तासात जिल्ह्यात ३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच नव्याने ...

Treatment started on 53 corona sufferers | ५३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

५३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

चंद्रपूर : मागील २४ तासात जिल्ह्यात ३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच नव्याने ३ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या ३ रुग्णांमध्ये सिंदेवाही एक, तर राजुरा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात, चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणही एकही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६०४ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १२ झाली आहे. सध्या ५३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ६० हजार ८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ६९ हजार ७९३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३९ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Treatment started on 53 corona sufferers