अत्याधुनिक उपकरणाने किडणी रूग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:38 PM2018-12-02T22:38:53+5:302018-12-02T22:39:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : किडणी आजाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण ...

Treatment of kidney patients with state-of-the-art equipment | अत्याधुनिक उपकरणाने किडणी रूग्णांवर उपचार

अत्याधुनिक उपकरणाने किडणी रूग्णांवर उपचार

Next
ठळक मुद्देउपकरणे खरेदीला मान्यता : सामान्य रूग्णालयाचे सीओपीडी कक्ष सुसज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : किडणी आजाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयातील सीओपीडी कक्षामध्ये आधुनिक उपकरणे खरेदी करण्यास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली आहे. यामुळे अत्याधुनिक सुविधांसाठी ताटकळत असणाºया शेकडो किडणी रूग्णांच्या यातना संपण्याची आशा निर्माण झाली आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील विविध वॉर्डांमध्ये आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रसुती विभागापासून तर बालरोग विभागापर्यंत अनेक सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून दररोज हजारो रूग्ण उपचारासाठी येत असल्याने आरोग्य विभागावर मोठा ताण आहे. मात्र मागील काही महिण्यांपासून सामान्य रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना बºयापैकी उपचार मिळू लागले. मात्र किडणी आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांना अत्याधुनिक आरोग्यसुविधा मिळावी, करिता सीओपीडी कक्षामध्ये उपकरणांचा अभाव होता. यासंदर्भात जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशासनाने राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
त्यामुळे राष्टÑीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत २०१८ - १९ करिता जिल्हा सामान्य रूग्णालयातील स्थापन करावयाच्या सीकेडी (क्रोनिक किडणी डिसीज) आणि क्रोनिक अब्स्टॅक्टीव्ह पुलमॅनरी डिसिज (सीओपीडी) कक्षामध्ये उपकरण खरेदीसाठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. या उपकरणांमुळे किडणी आजाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांना दर्जेदार आधुनिक उपचार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपकरणांसाठी ७३ लाखांचा निधी
जिल्हा सामान्य रूग्णालयातील सीकेडी आणि सीओपीडी कक्षामध्ये उपकरण खरेदी करण्यासाठी शासनाने ७३ लाख ३० हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये किडणी उपचारासाठी आवश्यक असणाºया सात अत्यंत महत्त्वपूर्ण उपकरणांचा समावेश आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शर्थी व अटींच्या अधिन राहून जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून ही उपकरणे लवकरच खरेदी केली जाणार आहेत.

Web Title: Treatment of kidney patients with state-of-the-art equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.