गुजगव्हान गावाजवळ ट्रॅव्हल्स बस उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:43 IST2019-07-08T22:42:54+5:302019-07-08T22:43:10+5:30
वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गालगत गुजगव्हान गावाजवळ चिमूरवरून चंद्रपूरला जाणारी ट्रॅव्हल्स उलटल्याने तीन प्रवाशी जखमी झाली. जखमींची नावे कळू शकली नाही. उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच मागील दोन वर्षांपासून चौपदरीकरण सुरू आहे.

गुजगव्हान गावाजवळ ट्रॅव्हल्स बस उलटली
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गालगत गुजगव्हान गावाजवळ चिमूरवरून चंद्रपूरला जाणारी ट्रॅव्हल्स उलटल्याने तीन प्रवाशी जखमी झाली. जखमींची नावे कळू शकली नाही. उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच मागील दोन वर्षांपासून चौपदरीकरण सुरू आहे. सोमवार सकाळी साई ट्रॅव्हल्स कंपनीची एमएच ३४ एबी ८१५१ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स् चिमूरवरून चंद्र्रपूरकडे जात होती. समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स उलटली. माहिती मिळताच शेगावचे ठाणेदार सुधीर बोरकुटे पथकासह दाखल झाले. पोलीस व गुजव्हान येथील नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढून शेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.