शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

जिल्ह्याची वाहतूक धोकादायक वळणावर

By admin | Published: June 21, 2014 11:53 PM

चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या सीमा वाढत आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत आहे.

जड वाहतूकही तेजीत : वाहने वाढली; मात्र व्यवस्थेत बदल नाहीचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या सीमा वाढत आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत आहे. उद्योगांमुळे जड वाहतूक वाढली आहे. या जड वाहतुकीमुळे रस्त्यांचे बारा वाजले आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढून वाहतूक धोकादायक वळणावर येऊन ठेपली आहे.चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. सिमेंट उद्योग, कोळसा खाणी, थर्मल पॉवर स्टेशन, एमईएल, आर्डीनन्स फॅक्टरी याशिवाय अनेक उद्योग जिल्ह्यात आहे. आणखी अनेक उद्योग प्रस्तावित आहेत. या उद्योगांमुळे बाहेर राज्यातील कामगार, कर्मचारी जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या वाढून २३ लाखांच्या घरात गेली आहे. यासोबतच जिल्ह्यात मोठ्या शहरांच्या सीमारेषेतही वाढ होत आहे. शहरे वाढल्याने नागरिकांना प्रत्येक गोष्टींसाठी वाहनांची गरज पडू लागली आहे. नागपूर, मुंबईसारख्या मेट्रो सीटीप्रमाणे वाहतूक साधने नसल्याने स्वत:चे वाहन घेण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही. त्यामुळे वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च २०१४ पर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७४ हजार ४४७ वाहनांची नोंद आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१४ पर्यंत एकूण २८ हजार ९३५ वाहने पासींग करण्यात आली आहेत. यात दुचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. २०१३-१४ मध्ये दुचाकी वाहनांची संख्या २४ हजार ३२३ पर्यंत वाढली आहे. यात मोटर सायकलची संख्या १५ हजार १२८, स्कूटरची संख्या ५ हजार ५०३ व मोपेडची संख्या ३ हजार ६९२ आहे. कारच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षात १ हजार ७२८ कारसोबतच २४५ जीपचे पंजीकरण येथील आरटीओ कार्यालयात करण्यात आले आहे. यासोबतच टुरिस्ट लक्झरी बसची संख्याही ५६ झाली आहे. आॅटोरिक्षाची संख्या ९३, मिनीबस १६, स्कूल बस ३६ व खासगी सर्व्हिस वाहने ६ अशी वाहनांची संख्या आहे. उद्योगांमुळे जिल्ह्यात औद्योगिक अपघातही वाढले आहेत. यामुळे रुग्णवाहिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. यावर्षात १७ रुग्णवाहिका, ३३ मल्टी सर्व्हिसेस वेहीकल, २२६ ट्रक आणि लॉरी, १२ टँकर्स, ७८८ चारचाकी डिलेव्हरी वाहने, ९७ तीनचाकी डिलेव्हरी वाहने, ९६१ ट्रक्टर्स, २३२ ट्रेलर व इतर ६६ वाहनांचेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पंजीकरण करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येत वाहने वाढत आहेत. मात्र त्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेत पाहिजे तसा बदल अजूनही घडून आलेला नाही. अरुंद रस्ते आणखी अरुंद होत आहेत. याशिवाय रस्त्यावरील अतिक्रमणे वाढली आहेत. सर्वात गंभीर बाब ही की निम्म्याहून अधिक रस्त्यांवर खड्डयांची मालिका आहे. चंद्रपूर शहराचाच विचार केला तर येथे पाच वर्षांपूर्वी जशी वाहतूक व्यवस्था होती, तशीच कायम आहे. वाहनांची संख्या मात्र तिपटीने वाढली आहे. त्यामुळे रस्ते वाहनांनी बरबटलेले दिसून येतात. परिणामी शहरात दररोज किरकोळ वा मोठे अपघात घडतच असतात. (शहर प्रतिनिधी)