Transparency in the sale of paddy due to the token system | टोकन पद्धतीमुळे धान विक्रीत पारदर्शकता
टोकन पद्धतीमुळे धान विक्रीत पारदर्शकता

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम ठरू पाहणारी मूलची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत टोकन पद्धत सुरू केली. धान विक्रीत पारदर्शकता आल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीच्या गेटजवळ धानाची पोती आल्यानंतर त्या संख्येने संबंधित शेतकऱ्यांना टोकन देण्याची पध्दत अवलंब केल्याने शेतकऱ्यांची लूट थांबली आहे. यामुळे शेतकºयांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे दिसून येते.
मूल तालुका धानाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. गोंदिया जिल्ह्यनंतर मूल तालुक्यात राईसमिलची संख्या सर्वाधिक आहेत. या तालुक्यातील धान मुंबई व इतर मोठया शहरात विक्रीसाठी पाठविला जातो. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यासाठी योग्य भाव व लयलुट थांबविण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी प्रयत्नरत होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी टोकन पद्धत अबलंबण्याची योजना आखण्यात आली. यापूर्वी टोकन पद्धती नसल्यामुळे आलेल्या धानाची हेराफेरी होत असल्याची चर्चा होत होती. हे टाळण्यासाठी टोकन पद्धत अवलंबण्यात आली. मूल शहराबरोबरच तालुक्यात राईसमिलची संख्या जास्त असल्याने तादंळाचा व्यापार मोठया प्रमाणात होतो. जोरदार, केशर, मालामाल, तेराबारा आदी धानाला सतराशे ते अठराशे रुपये तर जयश्रीराम, ५५५, जयप्रकाश आदी धानाला २२०० ते २५०० असा भाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राहाणार आहे.

धानाचे उत्पादन घटणार
मागील वर्षी जानेवारी १९ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे १३ कोटी ५७ लाख ९३ हजार ४९२ रुपये किमतीचे धान विक्रीसाठी आले होते. यावर्षी धानाचे उत्पादन समाधानकारक असले तरी धानाची उतारी येणार नसल्यामुळे धानाचे उत्पादन घटणार असल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व लयलुट थांबविण्यासाठी टोकन पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे धानाची कृषी उत्पन्न बाजार समितीत आल्यानंतर व्यवहारात पारदर्शकता राहाणार आहे. योग्य भाव व वेळेवर चुकारा देण्याची पध्दत निर्माण करण्यात आल्याने ही प्रक्रिया शेतकºयांच्या हिताची ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव व वेळेवर चुकारा देण्याची पध्दत बाजार समितीने तयार केली. तसेच शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान आणल्यानंतर होणारी लूट थांबविण्यासाठी टोकन पद्धत अवलंबली आहे. यामुळे आणलेल्या मालाचे जतन व मालाची हेराफेरी थांबविण्यासाठी मदत झाली आहे.
-घनश्याम येनुरकर, सभापती कृ.ऊ.बा. स.मूल

Web Title: Transparency in the sale of paddy due to the token system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.