प्रशिक्षित कार्यकर्तेच समाज परिवर्तनासाठी उपयुक्त
By Admin | Updated: July 31, 2016 01:57 IST2016-07-31T01:57:42+5:302016-07-31T01:57:42+5:30
समाजात अनेक वाईट प्रथा परंपरा आहेत. देशाच्या विविध भागात मूलनिवासी बहुजनांवर अन्याय करण्यात येत आहे.

प्रशिक्षित कार्यकर्तेच समाज परिवर्तनासाठी उपयुक्त
दोन दिवसीय प्रशिक्षण : बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे आयोजन
चंद्रपूर : समाजात अनेक वाईट प्रथा परंपरा आहेत. देशाच्या विविध भागात मूलनिवासी बहुजनांवर अन्याय करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात व्यवस्था परिवर्तन घडवून आणायचे असेल तर कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण झाले पाहिजे, असे प्रतिपादन बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक डी.आर. ओहोड यांनी केले.
बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर चंद्रपूर येथे पार पडले. याप्रसंगी बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक व राष्ट्रीय महासचिव डी.आर. ओहोड यांनी कार्यकर्त्यांचे संघटनात्मक प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणला राज्याच्या सर्व ११ जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत मुक्ती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, इंडियन इंजिनिअरिंग प्रोफेशनल असोसिएशन, इंडियन लायर्स असोसिएशन, टीचर्स अॅन्ड प्रोफेसर्स असोसिएशन, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, भारतीय किसान मोर्चा, मूलनिवासी मुस्लिम मंच, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आदी सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनाच्या सत्रात आयएलएचे राष्ट्रीय प्रभारी डॉ. राजू ताटेवार, राजकुमार थोरात व अमरावतीच्या प्रविणा भटकर उपस्थित होते.
यावेळी ओहोड म्हणाले की, बामसेफ गेल्या ४० वर्षांपासून ज्या व्यवस्थापन परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी झाली आहे, त्यासाठी प्रशिक्षित आणि दक्ष कार्यकर्त्यांची गरज आहे. प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांमध्ये विचारधारा रूजविण्यासाठी व प्रत्यक्ष काम करण्यासाठी लागणाऱ्या साधनांची निर्मिती कशी करावी तसेच काम करताना दक्षता घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित गाडगे आणि त्यांची संपूर्ण चमू, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय मुसळे, प्रोटानचे जिल्हा संयोजक देवेंद्र रामटेके, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे हेमंत भगत यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)