बांबू ताटव्यांची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:39+5:302020-12-22T04:27:39+5:30
नवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेञातील उपक्षेञ नवरगाव अंतर्गत रत्नापूर बिटात ताटव्याची अवैध वाहतूक करताना वनविभागाच्या पथकाने ट्रॅक्टर जप्त केला. ...

बांबू ताटव्यांची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात
नवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेञातील उपक्षेञ नवरगाव अंतर्गत रत्नापूर बिटात ताटव्याची अवैध वाहतूक करताना वनविभागाच्या पथकाने ट्रॅक्टर जप्त केला. या ट्रॅक्टरमधून ८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली. आरोपींची नावे सुनील प्रभाकर भाकरे व दयानंद आत्माराम बोरकर रा. पिपर्डा असे आहे.
रत्नापूर बिटामधील सरांडी परिसरातून विना क्रमांकाचा नविन ट्रॅक्टरद्वारे ताटव्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. नाकाबंदी करून ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये २४ हजार ५०० रूपयांचे बांबू ताटवे आढळले. वन विभागाच्या पथकाने ८ लाखांचा ट्रॅक्टर असा एकूण ८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नवरगाव येथील वनविभागाच्या विश्रामगृहात आणण्यात आले. हा ट्रॅक्टर निलकंठ बोरकर पिपर्डा यांच्या मालकीचा असल्याचीे माहिती आहे. ही कारवाई क्षेत्रसहाय्यक सुनील बुल्ले यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक जे. एस वैद्य, आर. यु. शेख, नीतेश शहारे, दिवाकर गुरुनुले, राजेश्री नागोसे आदींनी केली.