शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपुरात निघाली ट्रॅक्टर रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:57+5:302021-02-05T07:41:57+5:30
शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची महाराष्ट्र किसान सभेची मागणी चंद्रपूर : दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या ...

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपुरात निघाली ट्रॅक्टर रॅली
शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची महाराष्ट्र किसान सभेची मागणी
चंद्रपूर : दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र राज्य किसान सभेद्वारे चंद्रपुरात ट्रॅक्टर, दुचाकी रॅली काढली.
शहरातील आझाद बागेतून रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात नारेबाजी करीत प्रमुख मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावे, कामगारविरोधी ४ श्रमसंहिता रद्द करण्यात याव्या, पारित वीज विधेयक २०२० मागे घ्यावे, शेतीमालाला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, पेट्रोल, डिझेलचे दर व महागाई कमी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.
यावेळी नामदेव कनाके, विनोद झोडगे, डॉ. महेश कोपुलवार, संतोष दास, रामू तिवारी, गोपाल अमृतकर, संगीता अमृतकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, अश्विनी खोब्रागडे, सोनी, मयूर राईकवार, प्रल्हाद वाघमारे, वामन बुटले, नगरसेवक पप्पू देशमुख, किशोर पोतनवार, परमजित सिंग, दिलीप बर्गी ,प्रदीप चिताडे, प्रकाश वानखेडे , देवराव चवळे, रामदास डाहुले, दादाराव ठाकरे, कृष्णा चव्हाण, संभाजी रायवाड, राजू गैनवार यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.