ट्रॅक्टर पलटला :दबून एकाचा मृत्यू,एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST2021-07-02T04:20:18+5:302021-07-02T04:20:18+5:30
सिंदेवाही: तालुक्यातील मौजा चिटकी मूरपार येथील रोडलगत शेतशिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक ...

ट्रॅक्टर पलटला :दबून एकाचा मृत्यू,एक जखमी
सिंदेवाही: तालुक्यातील मौजा चिटकी मूरपार येथील रोडलगत शेतशिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली.
निकेश परसराम नैताम असे मृतकाचे नाव आहे. बुधवारी रात्री मौजा चिटकी मुरपार येथील रोडलगत असलेल्या शेतात एक ट्रॅक्टर पलटी झाले. ट्रॅक्टरच्या खाली दोन इसम दबून असल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मुसळधार पाऊस सुरू असल्याने रात्री गावकऱ्यांचे साहाय्याने ट्रॅक्टरखाली दबलेल्या दोन्ही व्यक्तींना बाहेर काढले. निकेश परसराम नैताम यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. आणि सखाराम मडावी जखमी झाले होते. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय येथे पोलीस वाहनाने उपचाराकरिता पाठविण्यात आले. जखमी रुग्णावर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.