मशागत आटोपली, मृगधारांची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:31 PM2018-06-05T22:31:36+5:302018-06-05T22:31:49+5:30

शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ पावसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे यासाठी शेतकºयांची बाजारात बी-बियाणांची चाचपणी सुरू आहे.

Towards the cultivation, the beggars' excursion | मशागत आटोपली, मृगधारांची आस

मशागत आटोपली, मृगधारांची आस

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांना चिंता : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरणार का ?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ पावसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे यासाठी शेतकºयांची बाजारात बी-बियाणांची चाचपणी सुरू आहे.
यावर्षी शंभर टक्के समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. आगामी काळात पीक निश्चितीच्या भावनेने खरीप हंगामातील बी-बियाणे, रासायनिक खते आदींच्या खरेदीसाठी शेतकरी आर्थिक उपाययोजना करण्यात गुंतले आहेत. डिझेलच्या वाढत्या किमतीने ट्रॅक्टरद्वारे शेत नांगरणी करणे यंदा महाग झाले आहे. यातून सावरत शेतकºयांनी आपल्या ऐपतीप्रमाणे बैल किंवा ट्रॅक्टरने मशागत करून पेरणीस सज्ज करून ठेवले आहे.
मात्र बाजारात बियाण्यांचे भाव वधारले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे खिशाला परवडेल अशा बियाणांची चाचपणी सुरू आहे. मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने पºहाटी उद्ध्वस्त झाली. तर मावा-तुडतुडा रोगाने धानपीकही हातून गेले. त्यामुळे या सर्व गोष्टी तपासूनच यंदा बियाणे खरेदी करण्याच्या मनस्थितीत शेतकरी आहेत. अशा परिस्थितीवर मात करीत केवळ यावर्षी चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी धावपळ करीत आहे. मृगधारा बरसल्यास पेरणीच्या कामांना धडाक्यात प्रारंभ होणार आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचे वातावरण असले तरी अद्याप मोठा पाऊस झालेला नाही.
पीक कर्जाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
यावर्षी शासनाने कर्जमाफी दिली. मात्र काही शेतकऱ्यांचा अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तर ज्यांना कर्जमाफी मिळाली किंवा ज्यांचा सातबारा कोरा आहे, अशांनी पीक कर्जासाठी अर्ज केल्यानंतरही कर्ज मिळालेले नाही. शासनाने आॅन दी स्पॉट कर्ज वितरण करण्यासाठी सर्व तालुका मुख्यालयात मेळाव्याचे आयोजन केले. मात्र येथेही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आल्याने शेकडो शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे.
बोगस बियाण्यांची भीती
सध्या शासनाने बंदी घातलेल्या कापूस बीटी बियाण्यांची जिल्हाभरात विक्री सुरू आहे. कृषी विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकून लाखोंचे बियाणे जप्त केले. असाच प्रकार धान बियाण्यांच्या बाबतीतही घडण्याची शक्यता आहे. बोगस बियाण्यांची विक्री झाल्यास फसगत होण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

Web Title: Towards the cultivation, the beggars' excursion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.