शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मशाल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:47+5:302021-01-02T04:24:47+5:30
बल्लारपूर : अखिल भारतीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व संसदेचे शीतकालीन अधिवेशन रद्द करण्याच्या ...

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मशाल मार्च
बल्लारपूर : अखिल भारतीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व संसदेचे शीतकालीन अधिवेशन रद्द करण्याच्या विरोधात तालुकास्तरावर मशाल आंदोलनाचे आयोजन माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. मशाल मार्च वस्ती विभागातील गांधी चौकातून बल्लारपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात व युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काढण्यात आला. आंदोलनात मशाली पेटवून मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्याचा निषेध करून दडपशाही करणाऱ्या सरकारविरोधी नारेबाजी करण्यात आली.
सदर कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या जिल्हा महासचिव ॲड. प्रीती शाह, युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम, दुर्गेश चौबे, शंकर महाकाली, गोपाळ कलवल, सिकंदर खान, जुनैद सिद्दीकी, करण कामटे, सुनील मोतीलाल, संदीप नक्षीने, अजहर शेख, शैलेश लांजेवार, चंचल मून, समीर खान, काशी मेगनवार, श्रीकांत गुजरकर, प्रेम दारला, अविनाश पोहनकर, रूपेश रामटेके, रोशन ढेंगळे, साहिल शेख, सोनू आमटे, मोहसीन भाई व युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती
फोटो : बल्लारपूर येथे मशाल मार्चमध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते.