टॉयलेट... उमेदवाराची एक उसनवारी कथा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST2021-01-01T04:20:05+5:302021-01-01T04:20:05+5:30

राजकुमार चुनारकर चिमूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चिमूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी ...

Toilet ... a borrowed story of a candidate! | टॉयलेट... उमेदवाराची एक उसनवारी कथा !

टॉयलेट... उमेदवाराची एक उसनवारी कथा !

राजकुमार चुनारकर

चिमूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चिमूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी उसनवारीची शक्कल लढविली आहे. शेजाऱ्याचे शौचालय वापरत असल्याचे स्वयंघोषणापत्राने दाखवून निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयल आहे.

टॉयलेटच्या अटीने उसनवारीची नवी कथा तालुक्यात जन्माला आली आहे.

तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धूमशान सुरू आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार नसल्याने या निवडणुका अधिक चर्चेत आल्या आहेत. सरपंच पदासाठी आरक्षण गुलदस्त्यात असल्याने पॅनेलचीही संख्या कमी दिसून येत आहे. तर अनेक उमेदवाराचे स्वतंत्र लढण्याचे नियोजन सुरू आहे. सदस्य पदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारापैकी बऱ्याच जणांकडे शौचालय नाही. निवडणूक लढविण्यासाठी सर्वच उमेदवारांना कागदपत्रांच्या सुमारे १८ अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यामधील शौचालय ही प्रमुख अट आहे. सदस्य पदासाठी बळजबरीने उभ्या केलेल्या ज्या उमेदवाराकडे शौचालय नाही, अशांनी शेजाऱ्याकडे असणाऱ्या शौचालयाची उसनवारी करून निवडणुकीपुरती प्रशासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी नामी शक्कल लढविली आहे. शेजाऱ्याचे शौचालय वापरत असल्याचे दाखविण्यासाठी स्वयंघोषणापत्र जोडले आहे. ते उमेदवारी अर्जासोबत जोडण्यात आले आहे. संबंधित उमेदवार खरोखरच शेजारच्याचे शौचालय वापरत असेल, तर हे करारपत्र यापूर्वी करणे आवश्यक होते. केवळ निवडणुकीची अट पूर्ण करण्यासाठी ते केले असेल, तर ते योग्य ठरणार का? हे अर्ज छाननी दिवशी स्पष्ट झाले आहे. शौचालय उसनवारीची लढविलेली नामी शक्कल ग्राह्य धरली गेलीच, तर निवडणुकीसाठी शौचालयाची अट का? घातली गेली आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज छाननी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये हे टॉयलेट उसनवारीचे असल्याचे उजेडात आले आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराचे स्वत:चे शौचालय नसले तरी शेजाऱ्याचे, सार्वजनिक टॉयलेट चालेल, असे आदेश आहेत. त्यामुळे अनेकांनी याबाबतचे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडले आहे. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे. मात्र शासन अनेक वर्षांपासून हागणदारीमुक्त गाव योजना राबवीत आहे. तरी आजही गावपुढारी बनण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे स्वतःच्या मालकीचे टॉयलेट नाही. तर ते गावाला हागणदारीमुक्त कसे करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Toilet ... a borrowed story of a candidate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.