आज प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन
By Admin | Updated: July 31, 2016 01:56 IST2016-07-31T01:56:53+5:302016-07-31T01:56:53+5:30
चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाद्वारे भद्रावती तालुका प्राथमिक शिक्षण संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन आज ३१ जुलै रोजी ...

आज प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन
भद्रावती : चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाद्वारे भद्रावती तालुका प्राथमिक शिक्षण संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन आज ३१ जुलै रोजी मुरलीधर पाटील गुंडावार लॉन येथे ११ ते ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. दिवसभरात विविध सत्र होणार आहेत.
अखिल भद्रावती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन हे दोन टप्प्यांत पार पडत असून पहिल्या टप्प्यात नवीन कार्यकारिणीची निवड व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील उईके, सरचिटणीस मुकुंदा जोगी, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत धर्मपुरीवार, उपाध्यक्ष मनोज मानकर, कोषाध्यक्ष विजय बारेकर, रविकांत आसेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील खुले चर्चासत्र व सत्कार समारंभाचे उद्घाटन पं.स. सभापती इंदुताई नन्नावरे यांच्या हस्ते होईल. संघटनेचे अध्यक्ष सुनील उईके व जि.प. सदस्य विजय वानखेडे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक वर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन सतीश फुलबोईनवार यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)