शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

सभापती व उपसभापती पदाची आज निवडणूक

By admin | Updated: September 13, 2014 23:47 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपत असल्याने निवडणूक होऊ घातली आहे.

बल्लारपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपत असल्याने निवडणूक होऊ घातली आहे. त्यानुसार पंचायत समिती स्तरावर रविवारी १४ सप्टेंबरला सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी सभा आयोजित केली आहे. आपल्याच पक्षाला सभापती व उपसभापतीपद मिळावे म्हणून राजकीय पक्षांकडून सदस्यांची पळवापळवी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार सभापती व उपसभापती पदासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देण्यात आली आहे. तद्नंतर दुपारी ३ वाजता विशेष सभेला सुरुवात होणार असून आवश्यक असल्यास मतदान प्रक्रियेने सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.जिल्ह्यात एकूण १५ पंचायत समिती असून यातील तब्बल आठ पंचायत समित्यांवर महिलांना सभापती पदाची संधी उपलब्ध होत असल्याने महिलाराज येणार आहे. बल्लारपूर, राजुरा, गोंडपिंपरी, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड, वरोरा व चिमूर पंचायत समितीचे सभापती पद महिला वर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.यामध्ये अनुसूचित जातीसाठी चिमूर, अनुसूचित जमातीसाठी गोंडपिंपरी व राजुरा, नागरिकांचा मागासप्रवर्ग वरोरा व बल्लारपूर, सर्वसाधारण महिला गटासाठी भद्रावती, सिंदेवाही व नागभीड पंचायत समिती असे महिलांना आरक्षण आहे.ब्रह्मपुरी अनुसूचित जाती, मूल अनुसूचित जमाती, जिवती व पोंभूर्णा नागरिकांचा मागासप्रवर्ग तर सावली कोरपना व चंद्रपूर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. चंद्रपूर पंचायत समितीमध्ये १२, भद्रावती ८, चिमूर १२, वरोरा ८, ब्रह्मपुरी ८, नागभीड १०, सिंदेवाही ८, मूल ६, सावली ८, पोंभूर्णा ४, गोंडपिंपरी ६, राजुरा ८, जिवती ४ व बल्लारपूर पंंचायत समितीमध्ये ४ असे एकूण ११४ जिल्ह्यात पंचायत समितीचे सदस्य आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपने ग्रामीण भागाच्या राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सदस्यांची पळवापळवी सुरू केली आहे. काहींना यात यश आले आहे. पंचायत समितीवर सत्ता प्राप्तीसाठी सदस्यांना प्रलोभन देण्याचा प्रकारही घडत आहे. यामुळे ग्रामीण भागाचे राजकारण ढवळून निघाले आहे. (शहर प्रतिनिधी)