आजपासून डॉक्टरांचे असहकार काम बंद आंदोलन
By Admin | Updated: July 1, 2014 01:23 IST2014-07-01T01:23:43+5:302014-07-01T01:23:43+5:30
ग्रामीण भागात जवळपास ८० टक्के नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविणाऱ्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे १ जूलैपासून महाराष्ट्र राज्य

आजपासून डॉक्टरांचे असहकार काम बंद आंदोलन
चंद्रपूर : ग्रामीण भागात जवळपास ८० टक्के नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविणाऱ्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे १ जूलैपासून महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे असहकार कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना फटका बसणार असून सेवा विस्कळीत होणार आहे.
यापूर्वी संघटनेने आंदोलन सुरु केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळले नसल्याने संघटनेने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
मॅग्मोचे राज्याध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड व सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार हे आझाद मैदाम मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु करणार आहे.
तसेच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात १ जूलै पासून जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी बेमुदत काळासाठी धरणे व निदर्शने करणार आहे. याच दिवसापासून सामुदायिक राजीनामेही देणार असून सर्वच कामावर बहिष्कार टाकणार आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये आंदोलनादरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणे देणार आहेत.यापूर्वी २ जूनपासून संघटनेने आंदोलन पुकारले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संघटनेला चर्चेसाठी बोलावून १० दिवसांत मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांमध्ये २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्ष लाभ द्यावा, अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा समावेश करावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्यात करण्यात आल्या. (नगर प्रतिनिधी)