आज चंद्रपूर बंदची साद

By Admin | Updated: July 3, 2014 23:28 IST2014-07-03T23:28:24+5:302014-07-03T23:28:24+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला शासनाच्या वेळकाढू धोरणाने धक्का दिला. या मुद्यावरून निराश झालेल्या चंद्रपूरकरांनी शुक्रवारी चंद्रपूर बंदची साद

Today Chandrapur Bandi Saad | आज चंद्रपूर बंदची साद

आज चंद्रपूर बंदची साद

वैद्यकीय महाविद्यालय द्या रिलायन्स हटवा : विरोधासाठी सामाजिक संघटना सरसावल्या
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला शासनाच्या वेळकाढू धोरणाने धक्का दिला. या मुद्यावरून निराश झालेल्या चंद्रपूरकरांनी शुक्रवारी चंद्रपूर बंदची साद दिली आहे. या सोबतच, रिलायन्स जीओ इन्फोकॉमला शहरात केबल टाकण्यासाठी आणि १०० टॉवरच्या उभारणीसाठी मंजुरी देताना महानगर पालिकेने नागरिकांच्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष केल्याच्या मुद्यानेही या आंदोलनाला बळ मिळाले आहे. या दोन्ही विषयांवरून होणाऱ्या बंदला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने शुक्रवारी उद्भवणाऱ्या स्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या चंद्रपूर बंदला जिल्हा आरोग्य संघर्ष समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, प्राचार्य फोरम, इंडियन मेडिकल असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तर, ज्येष्ठ नागरिक संघ आणि प्रबुद्ध नागरिक संघाने स्थानिक गांधी चौकात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात धरणे देण्याचे ठरविले आहे.
शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या संस्थाचालकांनाही बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. या सोबतच, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रपुरातून सकाळी १० वाजता मोर्चा काढण्याची आणि मोटार सायकल रॅली काढण्याची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी रामदास रायपुरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारच्या धोरणावर तीव्र शब्दात टिका करण्यात आली.

Web Title: Today Chandrapur Bandi Saad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.