चंद्रपूर जिल्ह्यात सरपणासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 09:13 IST2021-06-01T09:13:35+5:302021-06-01T09:13:57+5:30

Chandrapur news मूल तालुक्यातील सुशी दाबगावं येथील महिला वनविकास मंडळाच्या जगलात सरपणासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हमला करुन जागीच ठार केल्याची घटना आज मंगळवारी  सकाळच्या सुमारास घडली.

Tiger attack on a woman who went for firewood in Chandrapur district; Woman killed | चंद्रपूर जिल्ह्यात सरपणासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; महिला ठार

चंद्रपूर जिल्ह्यात सरपणासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; महिला ठार

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : मूल तालुक्यातील सुशी दाबगावं येथील महिला वनविकास मंडळाच्या जगलात सरपणासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हमला करुन जागीच ठार केल्याची घटना आज मंगळवारी  सकाळच्या सुमारास घडली.

वैशाली विलास मांदाळे रा. सुशी दाबगाव  असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे. सदर घटना वनविकास महामंडळाच्या सुशी दाबगाव येथील कक्ष क्रमांक 527 मध्ये घडली.

Web Title: Tiger attack on a woman who went for firewood in Chandrapur district; Woman killed

टॅग्स :Tigerवाघ