तीन दिवसांत ६५३ प्रवाशांनी केला एसटीने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:25+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बंद ठेवण्यात आलेल्या एसटी बसेस २२ मे पासून सुरू करण्यात आल्या. यामध्ये प्रत्येक सिटवर एक व्यक्ती या प्रमाणे एक एसटी बसमध्ये २२ प्रवाशी बसविण्यात येत आहे. यामध्ये ६५ वर्षावरील, दहा वर्षाच्या खालील मुले व गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांना वैद्यकीय कारण वगळता एसटी बसने प्रवासास तुर्तास बंदी घातली आहे.

In three days, 653 passengers traveled by ST | तीन दिवसांत ६५३ प्रवाशांनी केला एसटीने प्रवास

तीन दिवसांत ६५३ प्रवाशांनी केला एसटीने प्रवास

Next
ठळक मुद्देवरोरा आगाराची स्थिती : आर्थिक तोट्यात लालपरी जोपासतेय आपले ब्रिद

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्याकरिता मागील दोन महिन्यांपासून एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आल्या. २२ ते २४ मे या तीन दिवसाची वरोरा आगाराची आकडेवारी बघितल्यास केवळ ६५३ प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बंद ठेवण्यात आलेल्या एसटी बसेस २२ मे पासून सुरू करण्यात आल्या. यामध्ये प्रत्येक सिटवर एक व्यक्ती या प्रमाणे एक एसटी बसमध्ये २२ प्रवाशी बसविण्यात येत आहे. यामध्ये ६५ वर्षावरील, दहा वर्षाच्या खालील मुले व गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांना वैद्यकीय कारण वगळता एसटी बसने प्रवासास तुर्तास बंदी घातली आहे.
एसटीबसमध्ये प्रवाशांनी चढ उतार करताना सामाजिक अंतर ठेवले पाहिजे. एसटीबस स्थानकात पाच व्यक्ती एकत्रीत जमाव करता येणार नाही. आदी अटी शर्ती लागू करीत एसटी बस प्रवाशांकरिता सुरू केली आहे. एसटी बसमध्ये २२ प्रवासी नेत असताना तिकीट दरात वाढ करण्यात आली नाही, हे मात्र विशेष. वरोरा एसटी आगाराने २२ मे ते २४ मे या कालावधीत एसटी बसेसच्या १०२ फेऱ्या केल्यात. त्यामध्ये वरोरा- चिमूर, वरोरा- चंद्रपूर, सोईट, खांबाडा येथे एसटी सोडण्यात आल्या. त्यामध्ये ६५३ प्रवाशांनी प्रवास केला. कोरोना विषाणूचे दोन सकारात्मक रूग्ण वरोरा शहरात निघाल्याने शहर व तालुक्यातील व्यक्ती फक्त कामानिमित्त घराबाहेर निघत असल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम तीन दिवसातील एसटी बसवर झाला असल्याचे मानले जात आहे. मात्र तरीसुद्धा एसटी आपले ब्रिद जोपासत आर्थिक तोट्यात धावत आहे

प्रवाशांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे. या तीन दिवसात वरोरा तालुक्यात एसटी बसेसच्या अधिक फेºया घेण्यात आल्या. येत्या काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यात वरोरा आगाºयाच्या एसटी बसेस सोडण्यात येईल.
- प्रितेश रामटेके,
एसटी आगार प्रमुख, वरोरा
 

Web Title: In three days, 653 passengers traveled by ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.