दारू तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:27 IST2021-05-16T04:27:34+5:302021-05-16T04:27:34+5:30
सदर घटना शुक्रवारची आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक प्रवीण गाडवे रामसिंग, दत्ता दुब्बल, किशोर माडे प्लाटफाॅर्मवर निरीक्षण करीत असता ...

दारू तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
सदर घटना शुक्रवारची आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक प्रवीण गाडवे रामसिंग, दत्ता दुब्बल, किशोर माडे प्लाटफाॅर्मवर निरीक्षण करीत असता कोरबा या गाडीमधून दोन महिला व एक पुरुष उतरून घाईघाईने जात असताना दिसले. त्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड यांना ही माहिती दिली. बल्लारपूर पोलिसांनी साईबाबा वॉर्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिघांची चौकशी केली असता त्यांच्या जवळून ऑफिसर चॉईसच्या ६०० नग बॉटल ( अंदाजे किंमत १,२०,०००) मिळाल्या. त्या जप्त करून विवेकानंद वॉर्डातील महिला आरोपी लक्ष्मी सुधाकर गुलापल्ली, संतोषा असाला व राकेश सुधाकर गुलापल्ली या तिन्ही आरोपीस मुद्देमालासह गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.