दुकानफोडीतील तीन आरोपी जेरबंद
By Admin | Updated: August 3, 2014 00:01 IST2014-08-03T00:01:14+5:302014-08-03T00:01:14+5:30
येथील मुख्य मार्गावरील महात्मा गांधी व्यापार संकुलातील मोबाईल दुकान फोडून त्यातील चार लाख ३२ हजार १५२ रुपयांचा माल चोरी करून नेलेल्या आरोपींना मुद्देमालासह बल्लारपूर पोलिसांंनी पकडले आहे.

दुकानफोडीतील तीन आरोपी जेरबंद
बल्लारपूर :येथील मुख्य मार्गावरील महात्मा गांधी व्यापार संकुलातील मोबाईल दुकान फोडून त्यातील चार लाख ३२ हजार १५२ रुपयांचा माल चोरी करून नेलेल्या आरोपींना मुद्देमालासह बल्लारपूर पोलिसांंनी पकडले आहे.
दुकान फोडणाऱ्या आरोपींंचे नाव दीपक चंदू पोलकर (२५) आणि संतोष शामलाल बहुरिया (२४) दोघेही रा. लालबोडी भाग गोरक्षण वार्ड बल्लारपूर असे असून या दोघांना तद्वतच दीपक याची पत्नी आरती दीपक पोलकर (२१) हिला चोरीचा माल वापरल्या प्रकरणी आरोपी म्हणून गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपींनी २० जुलैच्या रात्री गांधी व्यापार संकुलातील राजेश तिलोकानी यांच्या मालकीच्या श्रीकृष्ण मोबाईल शॉपी या दुकानाची मागण्या भागातची भिंत फोडून दुकानातील २५ मोबाईल, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, चार्जर इत्यादी वस्तू चोरुन नेल्या व त्या आपल्या घरी लपवून ठेवल्या होत्या. चोरी केल्यानंतर त्यांनी दुकानाच्या भिंंतीवर ‘एक्स गॅग’ असे लिहून ठेवले होते. त्यामुळे या चोरीत पाच सहा जणांचा तरी सहभाग असावाा असावा अंदाज होता. या चोरीचा तपास पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरुमणी टांडी यांनी चालविला आणि दहा दिवसात या चोरीचा छडा लावून आरोपींना संपूर्ण मुद्देमालासह अटक केली. या दोघांनी यापूर्वी एका दुकानातून टीव्ही व इलेक्ट्रीक सामान चोरुन आपल्या घरी दडवून ठेवले होते. या झडतीत त्याही वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. दीपक व संतोष हे दोघेही रेल्वे सफाई कामगाार आहेत. (तालुका प्रतिनिधी)