शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कर्जदारांना धमकी व शिवीगाळ

By admin | Updated: April 1, 2016 01:27 IST

मूल तालुक्यातील रेगडी येथील आदिवासी शेतकऱ्यांना एका फायनन्स कंपनीने कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करून हातपाय तोडण्याची धमकी देत दुरध्वनीवरून अश्लील शिविगाळ केली.

मूल पोलीस ठाण्यात तक्रार : जिल्हा अधिकाऱ्याला दिले निवेदनभेजगाव : मूल तालुक्यातील रेगडी येथील आदिवासी शेतकऱ्यांना एका फायनन्स कंपनीने कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करून हातपाय तोडण्याची धमकी देत दुरध्वनीवरून अश्लील शिविगाळ केली. त्यामुळे पीडित आदिवासी लाभार्थ्यांनी ‘त्या’ फायनन्स कंपनी विरोधात मूल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून कंपनीवर कारवाहीची मागणी केली आहे.रेगडी येथील अशोक एकनाथ कुळमेथे यांनी २०१४ मध्ये एका फायनन्स कंपनीकडून १ लाख ४० हजार रुपये गृहकर्ज घेतले. यापैकी जवळपास ५८ हजार रुपये कंपनीला दिले. या दोन वर्षात पिके गेल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यास दिरंगाई होत असल्याने फायनन्स कंपनीने अधिकारी २८ मार्चला कुळमेथे यांच्या घरी सकाळपासूनच दिवसभर ठाण मांडून बसले होते.परंतु, शेतकऱ्यांने वेळेवर पैसे न जमल्याने विणवणी करून वेळ मागितला असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उर्मटपणाची परिसिमा गाठत आदिवासी महिलेला गहान राहून तर शेतकऱ्यांना मरा पण कर्जाचे हप्ते भरा असा, दम दिला. अधिकारी एवढ्यावरच थांबले नाही तर रात्री ९ च्या दरम्यान पुन्हा भ्रमणध्वनी करून मुलाचे हातपाय तोडून घरालाही नष्ट करण्याची धमकी दिली. या प्रकरणात आदिवासी कुटुंबांना मनस्ताप झाला आहे. त्यामुळे पीडित शेतकरी व गावातील विश्वास लक्ष्मण गेडाम, पांडूरंग उष्टूजी पेंदोर, देवानंद गणपत कन्नाके आदी आदिवासी १२ कर्जदारांनी मूल पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यामुळे या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)