शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीकडे निघाली हजारो पावले

By admin | Updated: October 14, 2014 23:15 IST

येथील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला आजपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवसीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक,

चंद्रपूर: येथील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला आजपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवसीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक, देश-विदेशातील अभ्यासकांचे प्रबोधन यावेळी होणार आहे. त्यासाठी येथील दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ दिनी भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, समीक्षक, साहित्यिक, देशविदेशातील प्रसिद्ध अभ्यासक उपस्थित राहणार आहे. पुस्तकांचे स्टॉल, आरोग्य विभाग, समाजसेवी संघटनांनी आपापले स्टॉल लावले आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ उपलब्ध राहणार आहे. थाईलंैड येथून दीक्षाभूमीवरील बुद्ध विहारात १६.५ फुट उंच अभय मुद्रेतील बुद्धरुपाचे दर्शन तसेच श्रद्धेय भिक्खू संघाकडून धम्म श्रेवणद्वारा धम्ममय आनंदाची रुजवण करण्यात येणार आहे. जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण द्वारा मानसवृद्धी, धम्मसंबंधीत उपयुक्त वस्तुचे स्टॉल, दीक्षाभूमीवरील रोपणातून बहरलेल्या बोधिवृक्षाचे दर्शन बांधवांना घेता येणार आहे.संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. दीक्षाभूमीस्थळी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र उभारण्यात आले आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभादरम्यान १५ आॅक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता वाहनासह मिरवणूक निघेल. १६ आॅक्टोबरला सकाळी डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूक निघणार आहे. बौद्ध बांधवांनी सहभागी होण्याची विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)