रोपवनात आग लागून हजारो रोपटे जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:28+5:30

वरोरा-चिमूर मार्गालगत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सालोरी उपक्षेत्रात सन २०१९ मध्ये राखीव वन कक्ष ४ अ मध्ये कार्यक्रमांतर्गत लावण्यात आले रोपे मोठे व्हावे, त्याला कुठलीही इजा पोहचू नये, याकरिता हजारो रूपये खर्च करून जाळीचे कुंपनही करण्यात आले आहे. त्यानंतर या रोपांचे संगोपन करण्याकरिता वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. परंतु रविवारी सकाळी सदर रोपवनात आग लागली.

Thousands of saplings were burnt in the fire | रोपवनात आग लागून हजारो रोपटे जळाली

रोपवनात आग लागून हजारो रोपटे जळाली

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी गावातील वनामध्ये रविवारी आग लागली. या आगीत मागील वर्षी लावण्यात आलेली हजारो रोपटे जळाली. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. यामध्ये हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
वरोरा-चिमूर मार्गालगत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सालोरी उपक्षेत्रात सन २०१९ मध्ये राखीव वन कक्ष ४ अ मध्ये कार्यक्रमांतर्गत लावण्यात आले रोपे मोठे व्हावे, त्याला कुठलीही इजा पोहचू नये, याकरिता हजारो रूपये खर्च करून जाळीचे कुंपनही करण्यात आले आहे. त्यानंतर या रोपांचे संगोपन करण्याकरिता वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. परंतु रविवारी सकाळी सदर रोपवनात आग लागली. आगीमध्ये ५० हेक्टर जमिनीतील रोपे सापडले. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचेपर्यंत संपूर्ण रोपवनाला आगीने वेढले होते. एक वर्षापूर्वी रोपवन तयार करण्यात आले. आता पावसाळा सुरू होणार असल्याने त्या रोपांचा वृक्षारोपणात मोठा फायदा होणार होता, हे विशेष.

याच परिसरात झाले होते विना परवानगीने खोदकाम
ज्या परिसरातील रोपवनाला आग लागली, त्या लगतच्या वनातील एका नाल्यावर विना परवानगीने सिमेंट बंधारा बांधण्यास सुरूवात करण्यात आली होती. खोदकाम करताना त्याच वनातील असंख्य झाडाची कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी वनविभागााचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. अशातच आता रोपवनात आग लागल्याची घटना घडली.

Web Title: Thousands of saplings were burnt in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग