हजारो भाविकांनी घेतले माता महाकालीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:01:09+5:30
रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिद्ध महाकाली मातेच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी माथा टेकत देवीचे दर्शन घेतले. यासाठी पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हजारो भाविकांनी घेतले माता महाकालीचे दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिद्ध महाकाली मातेच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी माथा टेकत देवीचे दर्शन घेतले. यासाठी पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ वाजता मंदिर प्रशासनाच्या वतीने सुनिल महाकाले, प्रकाश महाकाले, मोहन महाकाले तसेच पुजारी गजानन चन्ने आदींच्या हस्ते पुजाअर्चना करण्यात आली. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
नवरात्रोत्सवातील गर्दी बघता कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महाकाली मंदिर संस्थेने ठिकठिताणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून ३० सुरक्षारक्षक तसेच १०० च्या वर स्वयंसेवक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, भक्तांना त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसरात मोठा मंडप तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे.
प्रसाद वितरणासाठी भाविकांची गर्दी
नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविक देवीला नैवद्य अर्पण करतात. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने प्रशासनाने भाविकांना पेढा वितरणासाठी बुकिंगची व्यवस्था केली आहे. ज्या दिवशी भाविकांचा नंबर असेल त्याच दिवशी ते पेढा वितरीत करू शकणार आहे.
देवीच्या दुप्पट्याला विशेष मागणी
यात्रेसाठी येणारी गर्दी बघून याठिकाणी अनेक दुकाने थाटली आली. यामध्ये देवीच्या नावाचे दुप्पटे आहेत. युवावर्गाकडून या दुप्पट्याला विशेष मागणी असल्याची माहिती दुकानदारांनी दिली. सोबतच कुुकंू, हळदी, ओटीच्या साहित्याचेही विशेष मागणी आहे.
विविध दुकाने सुजली
महाकाली देवी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे याठिकाणी विविध प्रकारचे दुकाने सजली असून भाविकही मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येत आहे. पुजा करताना देवीला कुंकू, गुलाल वाहण्यात येते. नारळ फोडण्यात येतो. त्यामुळे कुंकू, गुलाल, बुक्का, नारळ, मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. ही गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले असून विविध ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. महाकाली मंदिरात दोन मूर्ति आहेत. एक उभी मूर्ति म्हणजे लाल, पिवळा आणि नारंगी रंगाचे कापड असलेली मुख्य मूर्ती. मुख्य मूर्ती शिवलिंगशीदेखील आहे. दुसरी मूर्ती मूळ जागेच्या खाली आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी, एक विशिष्ट प्रकारचे सुरंगामधून चालणे आवश्यक आहे .