महापुरुषांचे विचार आधुनिक युगातही प्रासंगिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:34+5:302021-02-05T07:41:34+5:30
स्थानिक सुभाष वाॅर्ड जोखूनाला परिसरामध्ये संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयामध्ये भारत माता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे ...

महापुरुषांचे विचार आधुनिक युगातही प्रासंगिक
स्थानिक सुभाष वाॅर्ड जोखूनाला परिसरामध्ये संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयामध्ये भारत माता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे लोकार्पण, नक्षल हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस शिपाई तुषार बंडेवार यांच्या आई-वडिलांचा सन्मान, शांती संदेशाच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये गडचिरोली जिल्ह्याला लौकिक मिळवून देणारे आदर्श मित्र मंडळ पुणेचे अध्यक्ष उदय जगताप, सेवा मित्र मंडळ पुणेचे शिरीष मोहिते, तुळशीबाग गणेश मंडळाचे नितीन पंडित यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.
यावेळी वेणू बंडेवार, श्रीहरी बंडेवार यांचा श्री संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, वर्षा सुंचूवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वेणू बंडेवार यांनी आयुष्यात हा सन्मान विसरणार नाही, असे भावोद्गार काढले. हंसराज अहीर, तसेच हरीश शर्मा यांच्या हस्ते उदय जगताप, शिरीष मोहिते, नितीन पंडित यांचा सत्कार करण्यात आला. हरीश शर्मा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक श्रीनिवास सुंचूवार, संचालन डाॅ. मनीष कायरकर, नासिर खान यांनी तर आभार विनायक काळवे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.