शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' पाच सावकारांना पोलिस कोठडी ! पीडित शेतकऱ्याची डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे सोनोग्राफीतून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:06 IST

Chandrapur : नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्याला अवैध सावकारांनी एक लाख रुपयांचा आकडा अव्वाच्या सव्वा व्याजासह ७४ लाखांपर्यंत नेला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड / ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्याला अवैध सावकारांनी एक लाख रुपयांचा आकडा अव्वाच्या सव्वा व्याजासह ७४ लाखांपर्यंत नेला. यामुळे पीडित शेतकऱ्याला चक्क किडनी विकावी लागली. याप्रकरणातील पाच आरोपींना बुधवारी (दि. १७) ब्रह्मपुरी येथील न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. तर पीडित शेतकरी रोशन कुळे (३५) यांनी किडनी विकल्याचा दावा केल्याने त्यांची चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली. अहवालातून डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे. 

यामुळे आता पोलिस किडनी रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टीने तपास करण्याची शक्यता आहे. किशोर रामभाऊ बावणकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप बावणकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे व सत्यवान बोरकर यांनी न्यायालयात हजर करण्यात आले. मनीष पुरुषोत्तम घाटबांधे या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

रोशन कुळे या शेतकऱ्याला ब्रह्मपुरीतील सहा अवैध सावकारांनी एक लाखाच्या कर्जासाठी व्याजाच्या नावावर लुबाडणूक केली. इतकेच नव्हे, तर पैशासाठी अश्लील शिवीगाळ, मारहाणीसह अमानुष क्रूर कृत्य करण्यात आले. २१ मार्च २०२१ पासून हा प्रकार सुरू होता.

सावकारांच्या वाढत्या तगाद्याला कंटाळून दुचाकी, ट्रॅक्टर, साडेतीन एकर शेतीही विकली. यानंतर सावकारांकडून ४० ते ६० टक्क्यांपर्यंत व्याजाची रक्कम आकारण्यात आली. एवढी रक्कम कशी परतफेड करायची, या विवंचनेत असताना किडनी विकण्याचा निर्णय घेतला आणि कंबोडिया देशातील नानपेन शहरात आठ लाखांमध्ये डाव्या बाजूची किडनी विकली.

हा धक्कादायक प्रकार पुढे येताच राज्यभरात खळबळ उडाली. अधिक तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत. चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोशन कुळे या पीडित शेतकऱ्याची सोनोग्राफी करण्यात आली असता, डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे पुढे आले आहे. या दिशेने आता तपास करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Five Loan Sharks Jailed; Farmer's Kidney Removed, Sonography Reveals!

Web Summary : Five loan sharks are jailed after a farmer in Chandrapur was forced to sell his kidney due to exorbitant interest rates. Sonography confirmed the removal of his left kidney in Cambodia. Police are investigating a potential kidney racket.
टॅग्स :Vidarbhaविदर्भFarmerशेतकरी