This is the third time Mahilaraj will come to the Zilla Parishad | जिल्हा परिषदेवर येणार तिसऱ्यांदा महिलाराज
जिल्हा परिषदेवर येणार तिसऱ्यांदा महिलाराज

ठळक मुद्देअध्यक्षपद महिला राखीव : सत्ताधारी भाजपकडून जोरदार हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाºया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित झाल्याने चंद्रपूर जि.प.च्या राजकीय इतिहासात तिसऱ्यांदा महिलाराज येणार आहे. मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात राज्याच्या सर्व जि. प. अध्यक्षपदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. दरम्यान, ५६ सदस्य असणाºया चंद्रपूर जि.प.मध्ये सत्ताधारी भाजपकडे बहुमत असल्याने अध्यक्षपदाची माळ कोणत्या महिला सदस्याच्या गळ्यात पडते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गत अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत विश्वासू देवराव भोंगळे यांनी अडीच वर्षांच्या कालखंडात अध्यक्ष म्हणून कार्य करताना भाजपच्या ३६ सदस्यांना एकसुत्रात ठेवण्यात बºयापैकी यश मिळविले. काँग्रेसकडे केवळ २० सदस्य असतानाही सभागृहात सक्षम विरोधी पक्ष म्हणून प्रभाव दाखवता आला नाही. देवराव भोंगळे यांच्याकडेच भाजपचे गटनेतेपद आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराज सदस्यांनाही उघड विरोध करणे अशक्य झाल्याचे दिसून आले होते. उपाध्यक्षपदी क्रिष्णा सहारे तर समाजकल्याण सभापतिपदी ब्रिजभूषण पाझारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, कृषी व पशुसंवर्धन अर्चना जिवतोडे व महिला बालकल्याण सभापतिपदी गोदावरी केंद्रे जबाबदारी सांभाळत आहेत. जि. प. अध्यक्षपदासाठी ओबीसी अथवा सर्वसाधारण प्रवर्गातून आरक्षण निघाल्यास देवराव भोंगळे यांनाच दुसºयांदा संधी मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, मुंबईत मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत जि. प. अध्यक्षपद खुले प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित झाले. त्यामुळे काँग्रेसच्या वैशाली वासाडे (२००५) आणि भाजपच्या संध्या गुरूनुले (२०१५) यांच्या कालखंडानंतर यावेळी तिसºयांदा जिल्हा परिषदेवर महिलाराज येणार आहे.

पक्षश्रेष्ठी ठरवतील नव्या जि.प. अध्यक्ष - देवराव भोंगळे
जिल्हा परिषदेत बहुमतात असणाºया भाजपकडून अध्यक्षपदासाठी घुग्घुस जि.प. गटाच्या सदस्य नितू चौधरी, माजी अध्यक्ष संध्या गुरूनुले, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. चौधरी या जि. प. अध्यक्ष भोंगळे यांच्या घुग्घुस कर्मभूमी क्षेत्रातील आहेत. गुरूनुले यांना अध्यक्षपदाचा अनुभव आहे. तर जिवतोडे या सभापती आहेत. यापैकी एका महिला सदस्याच्या गळ्यात जि.प. अध्यक्षपदाची माळ पडते वा अन्य महिला सदस्याची वर्णी लागते, हे बघण्यासारखे आहे. याबाबत जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, भाजपकडे बहुमत आहे. १८ महिला सदस्य आहेत. कुणाला अध्यक्षपद द्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

Web Title: This is the third time Mahilaraj will come to the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.