साखळी उपोषणाचा तिसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 01:26 IST2016-03-10T01:26:03+5:302016-03-10T01:26:03+5:30

चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. ही करवाढ मागे करण्यात यावी, या व इतर ....

Third day of chain fasting | साखळी उपोषणाचा तिसरा दिवस

साखळी उपोषणाचा तिसरा दिवस

मालमत्ता करवाढ : आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. ही करवाढ मागे करण्यात यावी, या व इतर आणखी काही मागण्यांच्या पूर्ततेकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने येथील गांधी चौकात साखळी उपोषण सुरू आहे. मनपातील काँग्रेसचे नगरसेवकही नागरिकांसह उपोषण करीत आहेत.
सोमवारपासून काँग्रेस नगरसेवकांनी गांधी चौकात साखळी उपोषण सुरू केले. पहिल्या दिवशी नगरसेवक प्रशांत दानव, प्रविण पडवेकर, राजेश यादव व सुनील बोरने हे उपोषणाला बसले होते. ८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका सकिना अंसारी, लक्ष्मी पारनंदी, कार्यकर्त्या शमीम मोहम्मद इस्राईल व आशिया परवीन मोहम्मद हारुण यांनी उपोषण केले.
दरम्यान, आज बुधवारी माजी खासदार नरेश पुगलिया, राहुल पुगलिया, शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, डॉ. महावीर सोईतकर यांच्या हस्ते ८ मार्चला उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याला लिंबू पाणी देण्यात आले.
बुधवारी नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, देवीदास गेडाम, माजी नगरसेवक श्रीनिवास पारनंदी व भारत जंगम हे उपोषणाला बसले. यावेळी नरेश पुगलिया यांनी सदर आंदोलन हे जनतेच्या हितासाठी असून आणखी ते तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. मालमत्ता करात मनपाने केलेले वाढ ही जनतेसाठी अत्यंत क्लेशदायक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Third day of chain fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.