शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

नोकरीचे पहिले स्थळ गाठण्यासाठी ‘त्यांनी’ कापले शेकडो कि.मी.अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 5:00 AM

आपल्या रागीट स्वभावाने पोलीस ओळखले जातात. वरवर पाषाणहृदयी दिसणारे हे पोलीस दादा कापसाचे हृदय घेऊन जगतात. याचा प्रत्यय कोठारीकरांना नुकताच आला. जून १९७२ मध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक पदावर बालाजी झाल्टे कोठारी पोलीस ठाण्यात रूजू झाले होते. हे त्यांचे पहिले पोलीस ठाणे. काही काळ कोठारीत कर्तव्य बजावल्यावर झाल्टे यांची बदली झाली. त्यानंतर अनेक पोलीस ठाण्यात त्यांनी कर्तव्य बजावले. आज ते ७८ वर्षांचे झालेत.

प्रमोद येरावार लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : शासकीय नोकरीच्या कार्यकाळात या गावातून त्या गावात बदली ही ठरलेलीच असते. ‘विंचवाचं ओझं पाठीवर’ अशी म्हण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वापरली जाते. मात्र काही गावात जीव गुंततो. ज्या गावात पहिल्यांदा कर्तव्य बजावले, ते गाव गाठण्यासाठी एका ७८ वर्षीय निवृत्त ठाणेदाराने मुंबईहून  थेट कोठारी गाव गाठले. पोलीस ठाण्यात पाय ठेवताच ते गहिवरले. त्या ठाणेदाराचे नाव आहे बालाजी झाल्टे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून उपस्थित पोलीस कर्मचारीही भावुक झाले.आपल्या रागीट स्वभावाने पोलीस ओळखले जातात. वरवर पाषाणहृदयी दिसणारे हे पोलीस दादा कापसाचे हृदय घेऊन जगतात. याचा प्रत्यय कोठारीकरांना नुकताच आला. जून १९७२ मध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक पदावर बालाजी झाल्टे कोठारी पोलीस ठाण्यात रूजू झाले होते. हे त्यांचे पहिले पोलीस ठाणे. काही काळ कोठारीत कर्तव्य बजावल्यावर झाल्टे यांची बदली झाली. त्यानंतर अनेक पोलीस ठाण्यात त्यांनी कर्तव्य बजावले. आज ते ७८ वर्षांचे झालेत. ते सध्या मुंबईला वास्तव्यास आहेत. ज्या गावात त्यांनी ठाणेदार म्हणून पहिल्यांदा पाय ठेवले, त्या गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हातारपणाने शरीरही थकलेले. तरीही त्यांनी थेट मुंबईहून कोठारी गाठले. कोठारी पोलीस ठाण्यात पाय ठेवताच ते गहिवरले. 

जुन्या आठवणीत रमताना डोळे पाणावलेकोठारी पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत ठाणेदार तुषार चव्हाण यांनी विचारपूस केली असता बालाजी झाल्टे यांनी पोलीस ठाण्यात येण्याचे कारण सांगितले. हे ऐकून चव्हाणही थक्क झालेत. जुन्या आठवणींना झाल्टे यांनी उजाळा दिला. जुन्या आठवणीत रमताना झाल्टे यांचे डोळे पाणावले. उपस्थित पोलीसही भावुक झालेत. कोठारी पोलिसांनी शाल, श्रीफळ देऊन झाल्टे यांचा सत्कार केला.

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे