ते आजही चालवतात राष्ट्रसंताच्या भजनाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:21+5:302021-03-17T04:28:21+5:30

पिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव येथील एक भजन मंडळ मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रसंताच्या भजनाचा वसा जोपासत आहेत. राष्ट्रसंताच्या ...

They still run the Rashtrasantha Bhajan | ते आजही चालवतात राष्ट्रसंताच्या भजनाचा वसा

ते आजही चालवतात राष्ट्रसंताच्या भजनाचा वसा

पिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव येथील एक भजन मंडळ मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रसंताच्या भजनाचा वसा जोपासत आहेत.

राष्ट्रसंताच्या विचाराचा प्रचार व प्रसार करत ग्रामगीता घराघरात ठेवून तिचा समाज कार्यासाठी उपयोगात आणावा, या हेतुने हे मंडळ कार्य करीत आहेत. भजन, पोवाडे, नकला, कीर्तन भागवत करत राष्ट्रसंताच्या प्रचार व प्रसाराचे कार्य अविरत सुरू ठेवत

समाजातील अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती, हुंडाबळी, जातीभेद, विविध समाज प्रबोधन कार्यक्रम करण्याचे काम नवयुवक भजन मंडळाच्या माध्यमातून सुभाष करंडे, रेवाजी बुल्ले, विठोबा राऊत, तुषार येलतुरे, भारत कुथे, मनीषा अवसरे,शुभांगी कुथे यांनी सुरू केले आहे. २० वर्षांपासून त्यांचे हे काम आजही सुरूच आहे.

Web Title: They still run the Rashtrasantha Bhajan