शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आधार लिंक नसल्याने त्यांना गमवावे लागले प्राण, ...असा घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 09:22 IST

सुदर्शन नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात ७ मे रोजी दाखल करण्यात आले.

नितीन मुसळे -सास्ती (चंद्रपूर) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केल्याने रुग्णांची धावपळ व गोंधळ कमी व्हावा यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पोर्टलवर नाव नोंदणी करण्यासाठी त्या रुग्णाचे आधार कार्ड मोबाइलला जोडले गेले नसल्याने तीन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असतानाही राजुरा उपजिल्हा रुग्णालयात एका गंभीर रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या कोरोनाकाळातही जगण्यासाठी आधार लिंक अत्यावश्यक ठरली आहे.

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल सुरू केले. त्या माध्यमातून जिल्ह्यातील २६ कोविड रुग्णालयातील २५१ साधे बेड, ७४४ ऑक्सिजन बेड, १९७ आयसीयू बेड, ८४ व्हेंटिलेटर बेड अशा एकूण १२७६ बेडच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवून रुग्णांना त्यांच्या मोबाइलमध्येच बेडची उपलब्धता पाहून रुग्णालयाची पायपीट थांबविण्याच्या हेतूने सुविधा उपलब्ध करून दिली. या पोर्टलवरून बेड उपलब्धतेसाठी रुग्णाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाइलवर एक ओटीपी येतो व तो ओटीपी त्यात टाकल्याशिवाय रुग्णासाठी बेड उपलब्ध होत नाही. याच जाचक अटीचा फटका राजुरा उपजिल्हा रुग्णालयात अखेरची घटका मोजत असलेल्या साखरी (वा.) येथील ५५ वर्षीय सुदर्शन नागोसे यांना बसला. 

...असा घडला प्रकारसुदर्शन नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात ७ मे रोजी दाखल करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवरून व्हेंटिलेटर बेडची शोधाशोध सुरू झाली. यावेळी पोर्टलवर तीन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असल्याचे दाखवित होते; परंतु आधार लिंक नसल्यामुळे त्यांना दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतरही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊ शकला नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस