रुग्णालयांत जागा मिळेना, कोविड केअर सेंटर मात्र रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:41+5:302021-04-22T04:29:41+5:30
जिल्ह्यावरील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. जिल्ह्यात दैनंदिन सरासरी १५०० ते १६०० कोरोना बाधित रुग्ण आढळत असून सरासरी ...

रुग्णालयांत जागा मिळेना, कोविड केअर सेंटर मात्र रिकामे
जिल्ह्यावरील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. जिल्ह्यात दैनंदिन सरासरी १५०० ते १६०० कोरोना बाधित रुग्ण आढळत असून सरासरी २५ च्या जवळपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाची वाढलेली दाहकता व शहरी भागातील कोरोना रुग्णालयात पडणारे अपुरे बेड यामुळे रुग्णांसह नातेवाईकांची चिंता वाढली आहे. विशेषत: बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्येही हाऊसफुल्ल रुग्ण आहेत. सौम्य लक्षणे असलेले आणि शारीरिक त्रास नसतानाही रुग्णालयात भरती होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये मात्र अर्धे बेड रिकामे पडून आहे.
बॉक्स
कोविडग्रस्तांवर उपचार करणारे रुग्णालये २४
-----
कोविड केअरमध्ये २० टक्के बेड रिकामेच
बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात १४ कोविड सेंटर सुरु आहेत. तेथे जवळपास १६०० बेड्स उपलब्ध आहेत. त्यातील १२८० बेड्सवर रुग्ण आहेत. तर उर्वरीत ३२० बेड्स शिल्लक आहेत. अनेक रुग्ण रुग्णालयातच जाऊन उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
रुग्णांना सौम्य लक्षणे तरीही रुग्णालयात
कोरोनाबाधित झालेले परंतु, कोणताही शारीरिक त्रास नसलेले, सौम्य लक्षणे असलेले रुग्णही भीतीपोटी रुग्णालयात ॲडमिट होत आहेत. अशा रुग्णांनी स्वत:ला घरातच अलगीकरण करुन तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतले तर ते कोरोनामुक्त होतात. परंतु, भीतीपोटी रुग्णालयात ॲडमिट होऊन उपचार घेण्यावर अनेकांचा भर आहे.
बॉक्स
रुग्णांची बेडसाठी धडपड
कोरोनाची सौम्य लक्षणे असली तरी अनेक रुग्ण भीतीपोटी रुग्णालयात ॲडमिट होत आहेत. अनेकजण रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळावा, यासाठी राजकीय नेतेमंडळी, अधिकाऱ्यांमार्फत वशिला लावण्याचेही प्रयत्न केले जात आहेत.