१४ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:33 IST2021-09-04T04:33:36+5:302021-09-04T04:33:36+5:30

बाधित आलेला रुग्ण चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, ...

There is not a single corona patient in 14 talukas | १४ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

१४ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

बाधित आलेला रुग्ण चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या ८८ हजार ६५९ वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ७१ झाली आहे. सध्या ४८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ७८ हजार २१९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ८७ हजार ७६५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत १५४० बाधितांचे मृत्यू झाले आहेत. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: There is not a single corona patient in 14 talukas