कोरोना संकट काळातही विकासकामांना ब्रेक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:40+5:302021-03-17T04:29:40+5:30
फोटो गोंडपिपरी : कोरोना महामारीतही महाविकास आघाडीच्या सरकारने तटस्थ राहून लढा दिला व नागरिकांना कोरोना संकटात सुविधा पुरविल्या. ...

कोरोना संकट काळातही विकासकामांना ब्रेक नाही
फोटो
गोंडपिपरी : कोरोना महामारीतही महाविकास आघाडीच्या सरकारने तटस्थ राहून लढा दिला व नागरिकांना कोरोना संकटात सुविधा पुरविल्या. अशा बिकट परिस्थितीतही क्षेत्रातील विकासकामांना ब्रेक लागू दिला नाही, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले.
ते गोंडपिंपरी येथील नगरपंचायतच्या वतीने आयोजित विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, कृउबा समिती सभापती सुरेश चौधरी, उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे, गोंडपिपरी तहसीलदार के.डी. मेश्राम, नगरपंचायत मुख्याधिकारी विशाखा शेळकी, माजी नगराध्यक्ष सपना साकलवार ,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष संतोष बंडावार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी शासनस्तरावर परिश्रम घेऊन गोंडपिपरी शहरासाठी अडीच कोटींचा विकास निधी खेचून आणल्याचे सांगितले. यात गोंडपिपरी नगरपंचायतला प्रशासकीय इमारतीसाठी दीड कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला तर अंतर्गत रस्त्यासाठी एक कोटी व आगामी काळात साडेतीन कोटी रुपयाचा निधीची कामे असा आजवर सात कोटींचा व उर्वरित तालुक्यात आठ कोटी असे एकूण पंधरा कोटी रुपयांच्या विकास निधीची मंजुरी मिळवून दिली. याप्रसंगी गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाकरिता पत्रकार भवनात लक्ष रुपये मंजूर केल्याचे पत्र संघाकडे सुपूर्द केले, असेही ते म्हणाले. संचालन सचिन फुलझेले , प्रास्ताविक नगर रचनाकार विभागाचे अभियंते हेमंत भुजबळ, तर आभार मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी मानले.