निर्माल्य संकलनासाठी ठेवलेल्या टँंकची चोरी
By Admin | Updated: September 3, 2014 23:16 IST2014-09-03T23:16:37+5:302014-09-03T23:16:37+5:30
गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य भाविक नदी, तलावामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर प्रदूषण टाळता यावे यासाठी निर्माल्य संकलनासाठी महानगरप्रशासन

निर्माल्य संकलनासाठी ठेवलेल्या टँंकची चोरी
चंद्रपूर : गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य भाविक नदी, तलावामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर प्रदूषण टाळता यावे यासाठी निर्माल्य संकलनासाठी महानगरप्रशासन तयारीला लागले आहे. यासाठी झोननुसार प्लॉस्टीक ड्रमही खरेदी करण्यात आले आहे. रामाळा तलावाशेजारी निर्माल्यासाठी ठेवण्यात आलेली टाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारात घडला. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूरची ओळख प्रदूषित शहर अशी होत आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी तसेच आरोग्यासाठी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाचा पुढाकारही तेवढाच महत्त्वाचा आहे.
चंद्रपुरात गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी महानगरपालिकेने काही प्रमाणात का होईना प्रयत्न सुरु केले आहे. नगरसेवक संजय वैद्य यांनी इरईनदीच्या पात्रामध्ये गणेश विसर्जन तसेच निर्माल्यदानासाठी पात्र खोल करण्याची सातत्याने मागणी धरून लावली. या मागणीनंतर महानगरपालिकेने इरईचे पात्र खोल करण्याची मोहीम आरंभली आहे.
येथील इरई नदीच्या पात्राची स्वच्छता करून तेथे गणेश विसर्जनासाठी पात्र तयार केले आहे. सोबतच निर्माल्य टाकण्याची व्यवस्थाही केली आहे. मागील तीन दिवसांपासून जेसीबीच्या माध्यमातून पात्र खाल करण्याचे काम सुरु आहे. सदर कामावर आयुक्तांसह, नगरसेवक संजय वैद्य, पर्यावरण प्रेमी संस्था, जलबिलादरीसंस्थेचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे, बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नदीपात्राची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी आणखी काही उपाययोजना सुचविल्या आहे.
निर्माल्यजमा करून ते पुरल्या जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात निर्माल्य न टाकता ड्रममध्ये टाकावे, अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र आजही अनेक भाविक निर्माल्य ड्रममध्ये न टाकता ते नदीपात्रात टाकत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच काही चोरट्यांची नजर या ड्रमवर गेली आहे.रामाळा तलावाशेजारी ठेवलेली टँक चोरट्यांनी पळवून नेली. त्यामुळे मनपा प्रशासनही हतबल झाले आहे.आता मनपा वेगळी व्यवस्था करणार आहे. (नगर प्रतिनिधी)