वन व राजस्व विभागाच्या नाल्यातील रेतीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST2021-02-23T04:44:00+5:302021-02-23T04:44:00+5:30
अवैध रेती व वुक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी फौज आहे. शासनाने वेळोवेळी निर्णय घेऊन ...

वन व राजस्व विभागाच्या नाल्यातील रेतीची चोरी
अवैध रेती व वुक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी फौज आहे. शासनाने वेळोवेळी निर्णय घेऊन देखरेख व नियंत्रण योग्यवेळी करण्यात आले पाहिजे यासाठी त्यांचे सीमा क्षेत्र कमी करून कर्मचाऱ्याच्या संख्येत वाढ केली. तरीही शासनाचा उद्देश सफल झाला नाही. राजस्व खात्यातील नाल्यामधील रेतीच्या अवैधरीत्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात पोलीसपाटील व कोतवाल कार्यरत आहे. तलाठीचे क्षेत्र कमी करून त्यांची संख्या वाढविली आहे. नाल्यातील रेती तस्करांनी संपविली आहे. अधिकारी मात्र नावापुरतेच केसेस दाखल करून कारवाई करीत असल्याचे समजते. नाल्यातील रेतीसाठा मोजमाप करण्यासाठी चिन्ह नसते. त्यामुळे वाहतूक केल्यानंतर वाहतुकीचे चिन्ह व रस्ता मजुरांकडून नष्ट केला जातो. सध्या नाल्यातील रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक झालेली आहे. त्याचा परिणाम शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या उपयोगासाठी ट्रॅक्टर खरेदी केले आणि आता त्याचा उपयोग रेती तस्करीसाठी केला जात असल्याचे दिसून येते.