रोहित्रातील ऑईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:01+5:302021-03-17T04:29:01+5:30

फोटो सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्रातील १५० लिटर ऑईलची चोरी केल्याप्रकरणी कनिष्ठ ...

Theft of oil from Rohitra | रोहित्रातील ऑईलची चोरी

रोहित्रातील ऑईलची चोरी

फोटो

सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्रातील १५० लिटर ऑईलची चोरी केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध तळोधी (बा) पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सावरगाव येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शाखेचे कार्यालय आहे. दरम्यान येथील शेतकरी पांडुरंग कवळू निकुरे यांनी त्यांच्या नागभीड -चंद्रपूर महामार्गावरील सावरगाव मामा तलावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या शेतातील कृषिपंपाचा विद्युत पुरवठा एकाएक खंडित झाल्याची तोंडी सूचना मंगळवारी कार्यालयात येऊन दिली. त्यानुसार कनिष्ठ अभियंता एम. वी. बोंडे यांनी वरिष्ठ तंत्रज्ञ दांडेकर यांच्यासह चौकशी केली असता सदर शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला विद्युत पुरवठा करणाऱ्या

रोहित्रातील दीडशे लिटर ऑईलची अज्ञात इसमाने चोरी केल्याचे निदर्शनात आले. घटनास्थळी सदर रोहित्राचे तीनही डीओ फ्युज तुटून होते. त्याचप्रमाणे ड्रेनेजचा बोल्ट लूज होता आणि त्याचे सेफ्टी लोखंडी बॉक्स कव्हरचे वेल्डिंग तुटून आकाशी रंगाचे बॉक्स कव्हर तुटून खाली पडून होते. काही ऑईल खाली पडलेले दिसून आले. यावरून अज्ञात व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री ऑईलची चोरी केली असावी, असे निष्पन्न झाले. तळोधी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Theft of oil from Rohitra