शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यनगरीत वाहतेयं चित्रपटांचे वारे

By admin | Updated: April 8, 2016 00:56 IST

सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या नवरगाव या नाट्यनगरीत मराठी चित्रपट ‘ताटवा’च चित्रिकरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार आहे.

गावात उत्साहाचे वातावरण : ‘ताटवा’चे चित्रिकरण आजपासून नवरगाव : सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या नवरगाव या नाट्यनगरीत मराठी चित्रपट ‘ताटवा’च चित्रिकरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार आहे. यामुळे गावात प्रचंड उत्साहाचे आणि फिल्मी वातावरण तयार झालेले आहे. विदर्भाची नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरगावला आता चित्रनगरी म्हणून ओळखले जाईल, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ‘वडार’ समाजातील एका कल्पीत आणि कलावंत मुलीवर या चित्रपटाची कथा आधारलेली असून श्वास आणि तानी या नावाजलेल्या मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध कलावंत व अरुण नलावडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सुप्रसिद्ध नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर हे या चित्रपटाचे कला दिग्दर्शक म्हणून काम बघतील. पटकथासंवाद महालींग कंठाळे, शैलेश ठवरे आणि सुरेश कांबळे यांनी लिहिली असून निर्मितीची संपूर्ण जबाबदारी शरयू पाझारे यांनी समर्थपणे उचलली आहे. त्यांच्या समवेत संजय कोंडबत्तुवार आणि महालींग कंठाळे हे सहनिर्माते आहेत. बॉलीवुडमधील ज्येष्ठ कॅमेरा दिग्दर्शक इमतीयाज बारगीर हे सर्व दृष्य आपल्या कल्पक नजरेतून कैद करतील. बी विशाल आणि महालिंग कंठाळे यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, साधना सरगम, शंकर महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी आणि जावेद अली या दिग्गज गायकांनी गाणी गायलेली आहेत.वैष्णवी आर्टस प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात स्वत: अरुण नलावडे व त्यांच्यासोबत कापूस कोंड्याची गोष्ट आणि रंगपतंगा या मराठी सिनेमातली प्रमुख तारका गौरी कोंगे, संजय सोज्वळ, शरयू पाझारे, सरिता घरडे, शितल राऊत, देवेंद्र दोडके, चिंधीबाजार फेम नुतन धवने आणि बालकलावंत म्हणून विक्रांत सदांनद बोरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.सोबत या चित्रपटातून श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगावचे आणि जिल्ह्यातील आणि गावतील शंभरहून अधिक स्त्री-पुरुष कलावंत पडद्यावर झळकणार आहेत. सुप्रसिद्ध रंगभूषाकार बाबा खिरेकर आणि सुधाकर कोकाटे हे वेशभूषा व रंगभूषा करणार असून गावातील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय तसेच कलादिग्दर्शक सदानंद बोरकर यांच्या घरातील कोपरे, कलात्मक झोपड्या आणि नवरगावच्या गल्लीबोळात आणि बाजारहाटात ‘ताटवा’च शुटींग होणार आहे. (वार्ताहर)