शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

पतीने केलेला शस्त्राचा वार पत्नीने चुकवला अन् पतीचाच गळा चिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 16:07 IST

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील घटना ; एका क्षणात संसार ३ उद्ध्वस्त, मुले पोरकी

लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : पतीला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे घर बरबाद होऊ लागले. यामुळे पती-पत्नीत नेहमी भांडण होत होते. बुधवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास दोघात कडाक्याचे भांडण झाले. पतीने टोकाचा निर्णय घेत धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला. तिने तो चुकवत त्याच्या हातातील शस्त्र घेऊन रागाच्या भरात पतीचा गळा चिरला व त्याची निघृण हत्या केली. ही मन सुन्न करणारी घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे घडली.

मृत पतीचे नाव अमोल मंगल पोडे (३८) रा. नांदगाव (पोडे), ता. बल्लारपूर असे आहे. घटनेतील आरोपी पत्नी लक्ष्मी अमोल पोडे (३५) हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता उघडकीस येताच घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. मृत अमोल हा पत्नी लक्ष्मी व दोन मुले देवांश अमोल पोडे (११) आणि सारंग अमोल पोडे (८) सोबत राहत होता. मात्र

अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले. यामुळे पती-पत्नीत नेहमीच वाद होत होता. दारूच्या व्यसनावरून पत्नीची व दोन लहान मुलांची आबाळ होत होती. यामुळे पत्नी लक्ष्मी त्रस्त होती. नेहमीप्रमाणे बुधवारी अमोल घरी मद्यधुंद अवस्थेत आला. घरी आल्यावर त्याने पत्नी लक्ष्मीसोबत वाद घातला. उभयतांत कडाक्याचे भांडण झाले. पतीने धारदार शस्त्राने पत्नीवर वार केला. तिने तो चुकवत त्याच्या हातातील शस्त्र घेऊन रागाच्या भरात त्याच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तो रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाला. त्यांचे हे भांडण व त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुले व लक्ष्मीची आई पार भेदरून गेले. जेव्हा लक्ष्मीला आपली चूक कळली तेव्हा तिने स्वतः फोन करून घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व तिला अटक केली. या घटनेचा अधिक तपास चंद्रपूर शहर पोलिस करीत आहेत. पोलिसांनी लक्ष्मीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १०३(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुलांचे भविष्य आले सकटातअमोल व लक्ष्मी पोडे यांच्या संसार वेलीवर दोन गोंडस मुले आली. तीच पती-पत्नीचा आधार होती. मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनाने सुखी संसार उद्ध्वस्त झाला. अमोल व लक्ष्मीची मुले देवांश पोडे व सारंग पोडे कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत होते. मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनामुळे खर्च परवडत नव्हता. त्यामुळे अर्मालने सहा दिवसांपूर्वी नांदगाव (पोडे) येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत देवांशला सहाव्या तर सारंगला तिसऱ्या वर्गात प्रवेश घेतला. लक्ष्मीच्या हातून पतीची हत्या झाल्याने दोन्ही शालेय मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूर