चक्क घरात शिरून वाघाने महिलेला केले ठार; सिंदेवाही तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 10:36 IST2022-04-28T10:32:34+5:302022-04-29T10:36:07+5:30

सिंदेवाही तालुक्यातील एका आठवड्यातील वाघ हल्ल्याची ही तिसरी घटना असून या घटनेमुळे परिसरात व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

The tiger broke into the house and killed the woman | चक्क घरात शिरून वाघाने महिलेला केले ठार; सिंदेवाही तालुक्यातील घटना

चक्क घरात शिरून वाघाने महिलेला केले ठार; सिंदेवाही तालुक्यातील घटना

सिंदेवाही (चंद्रपूर ) : वाघाने चक्क घरात घुसून महिलेला ठार केल्याची थरारक घटना सिंदेवाही तालुक्यातील घटना गुंजेवाही परिसरातील चीकमारा गावात घडली. रात्री १२ वाजता ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. वाघाच्या हल्ल्याची तालुक्यातील आठ दिवसात ही तिसरी घटना आहे, तर गुंजेवाही परिसरातील आठ दिवसातली दुसरी घटना आहे.

तुळजाबाई परसराम पेंदाम (८९) असे मृत महिलेचे नाव आहे. रात्रीला घरातील सर्व कामं आटोपून तुळजाबाई झोपी गेल्या. दरम्यान रात्री १२ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने घरात शिरून अचानक एकट्याच झोपलेल्या तुळजाबाईवर हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती कुटुंबीयांना होताच त्यांनी आरडाओरड केली. गावातील लोक जमा झाले. त्यामुळे वाघ तिथून पळून गेला. वनरक्षक सोरते, वनक्षेत्र अधिकारी विशाल सालकर व पोलीस निरीक्षक योगेश घारे घटनास्थळी दाखल झाले.

सिंदेवाही तालुक्यातील एका आठवड्यातील वाघ हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी सरडपार (चक), पवनपार येथे दोघांना वाघाने ठार केले. या घटनेमुळे परिसरात व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The tiger broke into the house and killed the woman