शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सावली विधानसभेच्या तत्कालीन आमदाराने भूषविले मुख्यमंत्री पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:58 IST

Chandrapur : मा. सा कन्नमवार यांनी केले महाराष्ट्राचे नेतृत्व

उदय गडकरी लोकमत न्यूज नेटवर्क सावली : परिसीमन आयोगाने गोठवलेल्या १५६ सावली विधानसभा क्षेत्रातून निवडून गेलेले स्व. मा. सा. कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्यानंतर स्व. वामनराव गड्डमवार, शोभाताई फडणवीस यांच्या गळ्यातसुद्धा मंत्रिपदाची माळ घालण्यात आली. शोभाताईंनी तर सलग चार पंचवार्षिक निवडणुका (९०, ९५, ९९, २००४) सावली विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. परंतु, या दोघांनाही मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारता आलेली नाही.

सन २००९मध्ये परिसीमन आयोगाने सावली विधानसभा क्षेत्र गोठवून सावली तालुक्याला ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात अंतर्भूत केले. सावली विधानसभा क्षेत्राचे अस्तित्वच मिटवून टाकले. १९५२मध्ये भारतात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला. तेव्हापासूनच मध्य प्रांतात सावली विधानसभा क्षेत्राचे अस्तित्व होते. मात्र, एकमेव स्व. मा. सा. कन्नमवार यांचे मुख्यमंत्रिपद सोडले तर कुणीही नेता त्या पदापर्यंत पोहोचू शकला नाही. 

६२ वर्ष पूर्ण १९६२ मध्ये निवडून आलेल्या स्व. कन्नमवार यांच्या निवडणुकीलाही ६२ वर्षांचा कालावधी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची पुनरावृत्ती या क्षेत्रातून झाल्यास जुन्या १५६ सावली विधानसभा क्षेत्राचा योगायोगच समजावा लागेल. महाराष्ट्रत पहिली निवडणूक १९६२ स्व. दादासाहेब कन्नमवार यांनी जिंकून ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९६७ स्व. वामनराव गड्डमवार, १९७२ स्व. यशोधरा बजाज, १९७८ देवराव भांडेकर, १९८०मध्ये स्व. महादेवराव ताजने, १९८५ स्व. वामनराव गड्डमवार, १९९० ते २००४ शोभाताई फडणवीस यांनी सावली विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरPoliticsराजकारणMLAआमदारChief Ministerमुख्यमंत्री