शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अजित दादांच्या 'ऑन स्पॉट' निर्णयाने 'एचएमटी' तांदूळ जनकाला मिळाली होती पाच एकर जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 20:48 IST

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने चंद्रपूर जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे. ३ जून २०२३ रोजी अजित पवारांनी जिल्ह्याला दिलेली भेट अखेरची ठरली. 

एचएमटी धानाचे जनक कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांची २०१० मध्ये जागतिक स्तरावर 'फोर्ब्स'ने दखल घेतली. मात्र, त्यांच्याकडे हक्काची जमीन नव्हती. दादाजींची संशोधन कीर्ती ऐकून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट नांदेड गाठले. ऑन स्पॉट निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खोब्रागडेंना पाच एकर जमीन व रोख पाच लाख दिले. अजित दादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धडकताच जिल्हाभरातील अनेकांना चटका लावून गेला. ३ जून २०२३ ही दादांची चंद्रपूर जिल्ह्याची अखेरची भेट ठरली आहे.

पंजाबराव कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी स्व. दादाजी खोब्रागडे यांचे एचएमटी वाण तपासण्यासाठी घेतले. पण, त्याचे श्रेय दादाजींना देण्याऐवजी विद्यापीठाने हे वाण पीकेव्ही एचएमटी या नावाने बाजारात आणले. तेव्हापासून दादाजींचा विद्यापीठाशी संघर्ष सुरू होता. अजित दादांनी ६ डिसेंबर २०१० रोजी नांदेड येथील भेटीत याबाबत संपूर्ण तपशील जाणून घेतला. घटनास्थळावरूनच त्यांनी मोबाइलने संबंधितांशी चर्चा केली. अखेर या संघर्षात दादाजींचा विजय झाला. त्यानंतर या सर्व वाणांना केवळ विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उचलून धरले.

अजित दादा म्हणाले 'मी भपकेबाज गोष्टींवर भर देत नाही' 

माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते असताना २८ जुलै २०२२ रोजी अजित दादांनी जिल्ह्याचा दौरा केला होता. दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी पक्षाकडून कुठलेही बॅनर लागले नव्हते. मात्र, थानोरकर कुटुंबीयांच्या समर्थकांनी मोठे बॅनर लावले. तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारताच, 'मी भपकेबाज गोष्टींवर भर देत नाही' असे मत व्यक्त केले.

अधिकाऱ्यांना फैलावर घेताच बदलला कोळसा

ऊर्जामंत्री असताना अजित दादांनी सीटीपीएसल भेट दिली होती. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर निकृष्ट कोळसा बदलविण्यात आला. शिवाय, काही दिवसांतच कोलमाफियांवर कारवाईही झाली होती. सिंचन प्रकल्पांना मोठा निधी मिळवून दिला. दादांच्या निर्णयाने जिल्हा वार्षिक योजनेचा नियतव्यय २५ टक्क्यांनी वाढला. अजित दादा म्हणाले 'मी भपकेबाज गोष्टींवर भर देत नाही'

...अन् बाळू आली एअर अॅम्ब्युलन्स धानोरकरांसाठी

खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने दिल्लीत हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेव्हा एअर अॅम्ब्युलन्स मिळत नव्हती. अजित दादांना कळताच सूत्रे हलवून एअर अॅम्ब्युलन्स मिळवून दिली. फोन करून प्रकृतीची विचारणा करीत होते, अशी आठवण खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितली. बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर सांत्वनेसाठी अजित दादा ३ जून २०२३ रोजी धानोरकर यांच्या वरोरा निवासस्थानी आले. सांत्वन करून गेल्यानंतर ते पुन्हा जिल्ह्यात आले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's instant decision gave HMT rice's father five acres.

Web Summary : Ajit Pawar aided Dadaji Khobragade, HMT rice's originator, with land and funds. He supported Khobragade's university conflict and helped secure medical transport for MP Balu Dhanorkar. His actions significantly benefited Chandrapur district's development projects.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस