पहाडावरील दुर्लक्षित कुळसंगेगुड्याचा अंधार आता होणार कायमचा दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST2022-03-07T05:00:00+5:302022-03-07T05:00:44+5:30
कुळसंगेगुडा येथे २१ आदिवासी कुटुंो वास्तव्याला आहेत. मागील पाच वर्षांपासून गावात विद्युत पुरवठा व्हावा म्हणून गावकऱ्यांच्यावतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु, त्याची कोणाकडूनही दखल घेण्यात आली नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास राठोड यांनी कुळसंगेगुडा येथील जनतेच्या समस्या जाणून घेऊन काम मंजूर होईपर्यंत त्याचा सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांच्या प्रयत्नाने कुळसंगेगुडा गाव कायमचा अंधारमुक्त होणार आहे.

पहाडावरील दुर्लक्षित कुळसंगेगुड्याचा अंधार आता होणार कायमचा दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : तालुक्यापासून आठ किलोमीटर दूर वसलेल्या कुळसंगेगुडा येथे नवीन विद्युत जोडणीचे १७ लाख ४८ हजार ८६८ रुपये किमतीचे काम सुरू झाले आहे. यामुळे मागील पाच वर्षे दिव्याच्या साहाय्याने रात्र काढलेल्या कुळसंगेगुडावासीयांच्या नशिबी आलेला अंधार कायमचा दूर होणार आहे.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या यंत्रणेच्या देखरेखीत विद्युत विकास या उपशीर्षांतर्गत कुळसंगेगुडा गावात नवीन विद्युत जोडणीसाठी तांत्रिक मान्यता मिळाली असून, प्रशासकीय किंमत १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे काम जिल्हाधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेशानुसार मंजूर आहे. यासाठी कैलास राठोड यांनी सतत पाठपुरावा केला होता, हे विशेष.
कुळसंगेगुडा येथे २१ आदिवासी कुटुंो वास्तव्याला आहेत. मागील पाच वर्षांपासून गावात विद्युत पुरवठा व्हावा म्हणून गावकऱ्यांच्यावतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु, त्याची कोणाकडूनही दखल घेण्यात आली नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास राठोड यांनी कुळसंगेगुडा येथील जनतेच्या समस्या जाणून घेऊन काम मंजूर होईपर्यंत त्याचा सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांच्या प्रयत्नाने कुळसंगेगुडा गाव कायमचा अंधारमुक्त होणार आहे.
आदिवासी घटक योजनेतून मिळाला निधी
कुळसंगेगुड्यातील विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी घटक योजनेमधून १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून, आदिवासी बांधवांच्या घरात प्रकाश पोहोचविण्याचे काम महावितरणद्वारा सुरू करण्यात आले आहे.
मागील पाच वर्षांपासून आम्ही वारंवार विद्युत जोडणीसाठी अर्ज, निवेदने दिली. परंतु, कोणीही दखल घेतली नाही. गावात वीज नसल्याने २१ कुटुंबांनी खायच्या तेलाचे दिवे लावून एवढ्या रात्री काढल्या. कैलास राठोड यांच्यामुळे आमच्या गावात वीज येणार आहे.
- अंबाजी लिंगू कोटनाके,
गाव पाटील, कुळसंगेगुडा.