महिलांनी तक्रार करताच ठाणेदार ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:26 IST2021-03-20T04:26:17+5:302021-03-20T04:26:17+5:30

तालुक्यातील चेक ठाणेवासना, नवेगाव मोरे आणि वेळवा येथील अवैध दारू विक्रीविरोधात महिला बचत गट व ग्रामसंघाच्या महिलांनी आठवडाभरापूर्वी पोलीस ...

Thanedar on action mode as soon as women complain | महिलांनी तक्रार करताच ठाणेदार ॲक्शन मोडवर

महिलांनी तक्रार करताच ठाणेदार ॲक्शन मोडवर

तालुक्यातील चेक ठाणेवासना, नवेगाव मोरे आणि वेळवा येथील अवैध दारू विक्रीविरोधात महिला बचत गट व ग्रामसंघाच्या महिलांनी आठवडाभरापूर्वी पोलीस ठाण्यावर धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी एल्गार पुकारला होता.

लागलीच ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी दखल घेऊन पोलीस पथकाकडून चेकठाणेवासना, नवेगाव मोरे व वेळवा या गावातील अवैध दारू विक्रेत्यांच्या घराची झाडाझडती सुरू केल्याने दारूविक्रेते सध्यातरी भूमिगत झाल्याचे दिसत आहेत.

एरव्ही हाकेच्या अंतरावरील गावात राजरोसपणे अवैध दारूच्या गुंत्त्यांवर मद्यपींंचा धिंगाणा सुरू होता.

Web Title: Thanedar on action mode as soon as women complain