तालुकास्तरावरही टीईटी अर्ज स्वीकृती केंद्र
By Admin | Updated: October 5, 2014 23:02 IST2014-10-05T23:02:58+5:302014-10-05T23:02:58+5:30
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यावर्षी राज्यात दुसऱ्यांदा टीईटी परीक्षा होत असून उमेदवारांना अर्ज सादर करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी तालुकास्तरावरही

तालुकास्तरावरही टीईटी अर्ज स्वीकृती केंद्र
चंद्रपूर : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यावर्षी राज्यात दुसऱ्यांदा टीईटी परीक्षा होत असून उमेदवारांना अर्ज सादर करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी तालुकास्तरावरही अर्ज स्विकृत केले जात आहे.
पंचायत समिती गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षेचे अर्ज सादर करता येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेसाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करायचे होते. त्यामुळे अनेक दुरवरच्या तालुक्यातील उमेदवारांना अर्ज सादर करताना अनेक अडचणी आल्या. रांगेत तासन्तास उभे राहून उमेदवारांनी अर्ज सादर केलेत. याची दखल घेत उमेदवारांना त्रास होऊ नये म्हणून आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत पंचायत समिती गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहे. १४ डिसेंबरला टीईटी परीक्षा होणार आहे.
१ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून २२ आॅक्टोबर पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करायचे आहे.
२७ आॅक्टोबर पर्यंत चलनाव्दारे बँकेत शुल्क भरुन आॅनलाईन अर्ज ट्रानजेक्शन आयडीसह अपडेट करायचे आहे. आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत ३० आॅक्टोबर पर्यंत तालुका व जिल्हा अर्ज संकलन केंद्रावर सादर करायचे आहे. (स्थानिक प्रतिनिधी)