शेती ठेक्याने देण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:59+5:302021-01-01T04:19:59+5:30

सेल्फीच्या नादात अपघाताची शक्यता चंद्रपूर : येथील इरई नदीवरील दाताळा पूल बांधून तयार झाला आहे. सीलिंकच्या धर्तीवर असलेल्या या ...

The tendency to lease out agriculture | शेती ठेक्याने देण्याकडे कल

शेती ठेक्याने देण्याकडे कल

सेल्फीच्या नादात अपघाताची शक्यता

चंद्रपूर : येथील इरई नदीवरील दाताळा पूल बांधून तयार झाला आहे. सीलिंकच्या धर्तीवर असलेल्या या पुलाला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जात आहे. दरम्यान, पादचाऱ्यांसाठी तसेच वाहनांसाठी वेगवेगळे रस्ते आहे. मात्र काही अतिहौशी नागरिक पुलाच्या मध्ये सेल्फी काढत आहे. बऱ्याचवेळा रात्रीच्या वेळीसुद्धा येथे गर्दी होत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता असून संबंधितांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

----

भाजाबाजारसाठी जागा द्यावी

चंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये गोल बाजार, गंजवाड तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाजीबाजार भरतो. मात्र वडगाव परिसरातील नागरिकांना भाजी घेण्यासाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे या परिसरात भाजीबाजारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, येथे ग्रामीण भागातील शेतकरी येतात. मात्र त्यांना विक्रीसाठी जागाच नसल्याने इतरत्र भटकावे लागते.

--

चंद्रपूरच्या सौंदर्यीकरणात भर

चंद्रपूर: औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूरमध्ये सध्या सौंदर्यीकरणात भर टाकण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीने चौकांचे सौंदर्यीकरणावर भर देण्यात आला आहे. चंद्रपूर-नागपूर मार्गावरीलऊर्जानगर चौकामध्ये चंद्रपूरचा इतिहास दर्शविणारे चित्र साकारण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकांचे लक्ष वेधत आहे.

---

Web Title: The tendency to lease out agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.