शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये भीषण अपघातात 10 जण ठार, 5 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 00:38 IST

कोरपना-वणी मार्गावरील घटना; जखमींवर उपचार सुरू

चंद्रपूर : कोरपना- वणी मार्गावर कोरपनापासून 2 किमी अंतरावरील हेटी गावाजवळ भरधाव ट्रक व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत पावलेले सर्वजण यवतमाळचे रहिवासी आहेत. यामध्ये रिक्षाच्या चालकाचाही समावेश आहे.  वणीकडून कोरपनाकडे भरधाव येणाऱ्या ट्रकचा टायर फुटला. अशातच ट्रक अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाला धडकला. ही रिक्षा यवतमाळ जिल्ह्यातील महागावमधून मजुरांना घेऊन जात होती. कोरपना येथील विदर्भ कॉटन जिनिंगमध्ये मजुरीचे काम मिळेल या आशेने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मजुरवर्ग आला होता. मात्र काम उपलब्ध नसल्याने ही मंडळी कोरपना येथून एम एच 29 टी 8582 क्रमांकाच्या रिक्षाने स्वगावी कोरपना-वणी मार्गाने परत जात होती. सुमारे 2 किमी अंतरावर जाताच काळाने त्यांच्यावर घाला घातला. विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या एमएच 29 इ 1683 क्रमांकाच्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन रिक्षावर धडकला. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये रिक्षा चालकासह 15 ही जण वाहनात दबले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच कोरपनाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसरकर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. 

दीड वर्षांची मुलगी बचावलीया अपघातातून रिक्षामधील एक दीड वर्षांची मुलगी सुखरूप वाचली. काळ आला पण वेळ आली नव्हती याउ क्तीप्रमाणे ही चिमुकली या अपघातातून बचावली. 

टॅग्स :Accidentअपघात